विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : कुलभूषण जाधव अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत. भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांना 2017 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये केलेल्या सातत्यपूर्ण धोरणात्मक प्रयत्नांमुळे आणि पाकिस्तान सरकारने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाद मागितल्यामुळे, पाकिस्तानला सध्या नमतं घ्यावं लागले आहे.
Will Kulbhushan Jadhav finally be released from Pakistan?
कुलभूषण यांच्यासाठी पाकिस्तान संसदेमध्ये विधेयक पारित करण्यात आले आहे. या विधेयकामुळे कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्याचा अधिकार मिळाला आहे. इंडिया टुडेने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये वारंवार न्यायासाठी मागणी केली होती. जुलै, 2019 मध्ये पाकिस्तान सरकारला कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यात यावा असे आदेश आतंरराष्ट्रीय न्यायालया तर्फे देण्यात आले होते. भारताला त्याचा काऊन्सिलर अॅक्सेस द्यावा असे देखील न्यायालयाने आदेश दिले होते.
कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली
इम्रान खान सरकारच्या काळामध्ये 2020 मध्ये पाकिस्तान मधील संसदेमध्ये कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार अध्यादेश देखील काढण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. 10 जून रोजी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देणारे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आले होते. आणि आता या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कुलभूषण जाधव यांची सुटका होण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App