परमवीर सिंगांना फरार जाहीर करण्यास कोर्टाची मान्यता; 30 दिवसांत हजर झाले नाहीत तर संपत्ती करणार जप्त

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे अजूनही पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याची मुभा कोर्टाने मुंबई पोलिसांना दिली आहे.Court approves declaration of Paramvir Singh as absconding; If not present within 30 days, the property will be confiscated

त्याच बरोबर परमवीर सिंग हे येत्या 30 दिवसांमध्ये पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे विशेष सरकारी वकील जगताप यांनी स्पष्ट केले आहे.



परमवीर सिंग यांच्या संदर्भातील याचिकेची सुनावणी आज न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना परमवीर सिंग यांना फरार जाहीर करण्याची मुभा दिली.आता पोलीस परमवीर सिंग यांना “वॉन्टेड आरोपी” असे जाहीर करून त्यांना फरार देखील घोषित करू शकतात, असे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

त्याच बरोबर पुढच्या 30 दिवसांमध्ये परमवीर सिंग यांना शोधून अटक करण्यात आली नाही किंवा ते स्वतःहून पोलिसांसमोर अथवा न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यानंतर परमवीर सिंग यांची ज्ञात संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Court approves declaration of Paramvir Singh as absconding; If not present within 30 days, the property will be confiscated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात