मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) आणखी एक झटका बसला आहे. एनडीपीएस विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला जामीन मंजूर करताना सांगितले की, तिच्याकडून अमली पदार्थाची जप्ती “बेकायदेशीर” होती. ही जप्ती एनसीबी अधिकाऱ्याऐवजी अन्य महिलेने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले, जे बेकायदेशीर आहे.Mumbai Cruise Drug Case Court admits Drugs were recovered illegally from Nupur Satija the woman who searched was not an NCB officer
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) आणखी एक झटका बसला आहे. एनडीपीएस विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला जामीन मंजूर करताना सांगितले की, तिच्याकडून अमली पदार्थाची जप्ती “बेकायदेशीर” होती. ही जप्ती एनसीबी अधिकाऱ्याऐवजी अन्य महिलेने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले, जे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, नुपूर सतीजासह 20 जण आरोपी आहेत. नुपूरलाही ३० ऑक्टोबरला जामीन मंजूर करण्यात आला होता, तथापि पूर्ण न्यायालयाचा आदेश शनिवारी जाहीर झाला.
एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनारपट्टीवर एका क्रूझ जहाजावर छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह 20 जणांना अटक केली होती. आर्यनला तीन आठवड्यांनंतर जामीन मिळाला. या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या सतीजा हिला 30 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु तिचा तपशीलवार आदेश शनिवारी उपलब्ध झाला. तिच्याकडून ‘एक्स्टसी’च्या चार गोळ्या जप्त केल्याचा दावा एनसीबीने केला होता. विशेष न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी निरीक्षण केले की, एका महिला ‘पंच’ साक्षीदाराने आरोपीचा शोध घेतला होता परंतु “त्या ठिकाणी कोणतीही अन्य महिला अधिकारी उपस्थित नव्हती आणि या हेतूने अधिकृत व्यक्तीने कोणताही पंचनामा केला नाही,” असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे एनडीपीएस कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
एनसीबी बॅकफूटवर
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने २५ कोटींच्या लाचेचा आरोप झाल्यानंतर एनसीबीचे दक्षता पथक या प्रकरणात दाखल झाले आहे. प्रभाकरने काही स्वतंत्र साक्षीदार आणि एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी लाचखोरीच्या कोनातून तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाला वानखेडे पथकाने २ ऑक्टोबर रोजी मुंबई किनारपट्टीवरील कोरडेलिया या क्रूझ जहाजावर टाकलेल्या छाप्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली तपास करत असलेले ७ सदस्यीय पथक लवकरच एनसीबी मुख्यालयाला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
ड्रग्ज, दहशतवाद फंडिंग, क्रिप्टो करन्सीच्या धोक्यांपासून तरूणाईला वाचविण्यासाठी केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण पाऊले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक प्रकारे खासगी ऑपरेशन (बाहेरील लोकांवर छापे टाकणे) असल्याचे दिसते. या प्रकरणात गुंडांना (साक्षीदारांना) ज्या प्रकारे मोकळीक देण्यात आली त्यावर एनसीबीचे अधिकारी खुश नाहीत. या प्रकरणात सहभागी असलेल्या स्वतंत्र साक्षीदारांना देण्यात आलेल्या सूटवरून हे सिद्ध होते की ते एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना चांगलेच ओळखत होते. या छाप्यात सहभागी असलेल्या काही स्वतंत्र साक्षीदारांनी स्वत:ला एनसीबीचे अधिकारी दाखवून शाहरुख खानच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे दक्षता पथकाच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये किरण गोसावी प्रमुख होता, याशिवाय आणखी काही साक्षीदारही दक्षता पथकाच्या रडारवर आहेत.
साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात दोष
याप्रकरणी एफआयआर लिहिण्यास होणारा विलंबही अनेक प्रश्न निर्माण करतो. साक्षीदारांचे जबाबही चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्याचा आरोप प्रभाकर साईलसह अनेक स्वतंत्र साक्षीदारांनी केला आहे. दुसरीकडे, एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, मुंबईत आल्यानंतर एनसीबीच्या पथकाने सात साक्षीदारांचा तपासात समावेश केला आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पथकाने घटनास्थळी भेट दिली. ते पुढे म्हणाले- प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे, आम्ही लवकरच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह पुढे म्हणाले की, आपल्याला यंत्रणा स्वच्छ करायची आहे. आम्हीही चुकू शकतो. आमच्याकडून चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू. कोणताही विभाग निर्दोष नाही. समीर वानखेडे यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे ते म्हणाले. शपथपत्रात साक्षीदाराच्या नावाशिवाय एनसीबीचे अधिकारीही रडारवर असू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App