विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे रझा अकादमीने पोलिसांची परवानगी न घेता काढले होते. परंतु, याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या दंगलीमागे रझा अकादमी आहे की नाही हे माहिती नाही. तपास चालू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे वक्तव्य केले आहे. Raza Academy’s “role” in the riots; Mutual discrepancy in the statements of Dilip Walse Patil and Sanjay Raut !!; What exactly does Maharashtra want to understand ??
मात्र त्याच वेळी शिवसेनेचे खासदार प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात दंगल घडवायची ताकद रझा अकादमीमध्ये नाही. सरकारने तिच्यावर नियंत्रण आणले आहे, असे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीतील या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्येच महाराष्ट्रातील दंगलीबद्दल अशी परस्परविरोधी मते आहेत काय? त्यांच्या विधानांमधून महाराष्ट्राने नेमके समजायचे काय?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारची भूमिका मांडली. दंगलीमध्ये रझा अकादमी आहे की नाही माहिती नाही. तपास चालू आहे. तपास पूर्ण झाल्यावर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मग ती रझा आकादमी असो किंवा अन्य कोणीही असो, दोषींना महाराष्ट्र सरकार सोडणार नाही, असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
मात्र, संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या दंगलींची जबाबदारी भाजपची आहे. त्यांना महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप केला आहे. त्याच वेळी संजय राऊत यांनी रझा अकादमीची महाराष्ट्रात दंगली घडवायची ताकद नाही. सरकारने तिच्यावर नियंत्रण आणले आहे. महाराष्ट्रात दंगली पेटवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करून भाजपला राष्ट्रपती राजवट लादायची आहे. कोणती आम्ही ती लादू देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. त्रिपुरात काय घडले किंवा नाही, पण मग ते फोटो कसले होते? त्रिपुरातल्या घटनेचे पडसाद उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये का उमटले नाहीत? फक्त महाराष्ट्रातच का उमटले? असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
एकीकडे रझा अकादमी या दंगलीत आहे की नाही हे माहिती नसल्याचे विधान दिलीप वळसे-पाटील करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्र दंगल घडवण्याची क्षमता अकादमीमध्ये नाही, असे वक्तव्य संजय राऊत करतात. महाविकास आघाडीतल्या दोन वरिष्ठ नेत्यांनी मधल्या वक्तव्यांमधली मधली ही विसंगती आता महाराष्ट्रात राजकीय चर्चेचा विषय बनून राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App