विशेष प्रतिनिधी
काबुल : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुढाकाराने तालीबानच्या प्रश्नावर आठ देशांची बैठक घेण्यात आली होती. तालीबानने दहशतवादास पाठिंबा देऊ नये असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर तालीबानने म्हटले आहे की ही बैठक आमच्या हिताचीच होती. आम्हाला भारतासोबत चांगले राजनैतिक संबंध हवे आहेत.The Taliban want good political relations with India
तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे की, भारत देश आशियायी क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा देश आहे. सर्वांगीण विकास आणि सुरक्षादृष्टीने आम्हाला भारत सरकारशी चांगले राजनैतिक संबंध हवे आहेत. भारताने बोलावलेल्या बैठकीला अफगाणिस्तानचा प्रतिनिधी उपस्थित नसला तरी, ही परिषद आमच्या हिताचीच होती.
आमचे काही शेजारी देश अफगाणमधील सध्याच्या परिस्थितीचा विचार करीत आहे. त्यात सहभागी असलेल्या देशांनी सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि तालिबान सरकारला स्वत:हून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मदत करण्याचा विचार केला असेल. आम्ही विश्वास देऊ इच्छितो की, इस्लामिक अमिरातीच्या धोरणानुसार आमची भूमी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही.
10 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत भारतासह इराण, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सचिव सहभागी होते. यावेळी भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले होते.
भारत अनेक वर्षांपासून अफगाणी लोकांना मदत करीत आहे. त्या लोकांना भारताचा पाठिंबा अगदी स्पष्ट आहे. आम्ही या देशातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. विश्वास आहे की, ही चर्चा अफगाण लोकांच्या सुरक्षेला अधिक मदत करेल, असेही स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App