वृत्तसंस्था
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वात मोठा फटका प्रवाशांना बसला असून त्यांची कुचंबणा झाली आहे. दिवाळी सुटीसाठी गावी गेलेल्याचे हाल झाले. अनेकांना दुप्पट पैसे मोजून परतीचा प्रवास करावा लागला आहे. As many as 220st depots in the states are closed; Trauma of passengers due to strike of ST employees, The condition of those who have gone for Diwali holidays; Return trip cost double payment
कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील २५० पैकी २२० आगारातील काम ठप्प पडले आहे. बस सेवा बंद झाल्याने सामन्याची जीवनवाहिनी असलेली लाल परी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास २२० डेपोत संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज ४ कोटींचा फटका बसत आहे.
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने जवळपास १४ ते १५ तास राज्यभर संप केला. यात त्यांनी महागाई भत्ता, घरभत्ता यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही प्रमुख मागणी केली. त्यापैकी महागाई भत्ता व घर भत्ता वाढविण्याची मागणी मान्य झाली. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून काही आगार बंद आहेत. सुरुवातीला १० ते २० आगार बंद करण्यात आले. आताही संख्या २२० आगारांवर गेली आहे. त्याचा थेट फटका हा प्रवाशांना बसला आहे. गाववहून परतण्यासाठी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. अनेकांना दुप्पट पैसे मोजून प्रवास करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App