महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत एसटी कर्मचारी संपावर; पुणे, नागपूर, सांगली, जालना, अमरावतीत काम बंद


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यांमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. ST workers on strike in several districts of Maharashtra; Work stopped in Pune, Nagpur, Sangli, Jalna, Amravati

अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.



अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले असून जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत. जालना येथे अंबडमधील एसटी  कर्मचाऱ्यांनी देखील आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. सांगली जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरज मध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून  नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले आहेत. उद्या पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, भोर, बारामती डेपो बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एकही डेपो सुरू नाही.

ST workers on strike in several districts of Maharashtra; Work stopped in Pune, Nagpur, Sangli, Jalna, Amravati

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात