विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधी पक्षांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि एलपीजी गॅसची भाव वाढ हे दोन मुद्दे प्रमुख्याने लावून धरलेले दिसले.BJP’s election strategy to play on the front foot on the issue of inflation
या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत महागाईच्या मुद्द्यावर फ्रंट फूट वर कसे खेळता येईल, या विषयी मंथन होण्याची चिन्हे आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करणार असल्याने ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कोणता निवडणूक मंत्र देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
कारण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात महत्वाची निवडणूक उत्तर प्रदेश विधानसभेची आहे. येथे राम मंदिरापासून गुंड माफियांवरील कारवाईचे मुद्दे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुख्य अस्त्र असेल. त्याच वेळी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करून जी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत त्याविषयी आक्रमकपणे सर्व राज्यांमध्ये प्रचार करण्याचे आदेश मोदी देण्याची शक्यता आहे.
Modi Government Campaign :वृद्धांना मोफत मेडिकल किटसोबत मोफत तपासणी ; १० ऑक्टोबर पासून सुरु होणार मोहीम
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारांनी मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून दिलासा देण्याची अपेक्षा होती. देशातल्या 22 राज्यांनी ती पूर्ण केली. परंतु 14 राज्यांनी मात्र ही अपेक्षा अद्याप पूर्ण केलेली नाही. तेथे भाजपला आता अत्यंत आक्रमक मूडमध्ये आंदोलन करण्याच्या स्थितीत आहे. झारखंड मध्ये आज त्याची झलक दिसली आहे. हेच मुद्दे इतर राज्यांमध्ये देखील भाजप आक्रमकपणे लावून धरताना दिसण्याची शक्यता आहे.
या खेरीज पंजाब मध्ये कृषी कायद्यांचा मुद्दा भाजप कसा हाताळणारे याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी स्वतःचा “टच” कसा देतात? त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी उभे केलेले आव्हान भाजप इतर राज्यांमध्ये कसा परतवून लावतो या दृष्टीनेही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते “मोदी मंत्राच्या” प्रतीक्षेत असलेले दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App