TV Channel Price Hike : मनोरंजन होणार ५० टक्के महाग ; १ डिसेंबरपासून केबल टीव्ही-खासगी चॅनेल्सचे शुल्क वाढणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग कंपन्यांनी आणि चॅनल्सनी (TV Channel)आपले शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. झी नेटवर्क, स्टार, सोनी आणि वॉयकॉम १८ यांनी काही चॅनल्सचे प्रसारण नेहमीच्या शुल्काबाहेर केले आहे.म्हणजेच टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता काही चॅनल्स पाहण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. प्रेक्षकांचा टीव्ही पाहण्याचा खर्च तब्बल ५० टक्क्यांपर्यत वाढू शकतो.

देशातील ब्रॉडकास्टिंग आणि मोबाइल सेवा इत्यादींचे नियमन करणारी संस्था असलेल्या ट्रायने (TRAI- Telecom Regulatory Authority of India) नवे टॅरिफ ऑर्डर लागू केल्यामुळे हे शुल्क वाढणार आहे. TV Channel Price Hike : Your entertainment will become costlier ; as TV channels to rise their charges


वानखेडेंचा दाढीवाला मित्र, तिघांचे CDR आणि CCTV फुटेज तपासा , नवाब मलिकांचे पत्रकार परिषदेत दावे


लोकप्रिय चॅनलसाठी अधिक शुल्क

स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि इतर काही लोकप्रिय चॅनल पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३५ ते ५० टक्क्यांपर्यत जास्त पैसे मोजावे लागतील. नव्या किंमतींकडे पाहता जर एखाद्या प्रेक्षकाला स्टार आणि डिस्ने इंडियाचे चॅनल पाहायचे असेल तर त्याला ४९ रुपयांऐवजी ६९ रुपये दर महिन्याला खर्च करावे लागतील. तर सोनी टीव्ही पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये दर महिन्याला खर्च करावे लागतील. झी नेटवर्कसाठी ३९ रुपयांऐवजी ४९ रुपये खर्च करावे लागतील तर व्हायकॉम-१८चे चॅनल पाहण्यासाठी २५ रुपयांपेक्षा ३९ रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

ट्रायचा महत्त्वाचा निर्णय

ट्राय ने मार्च २०१७ मध्ये एक निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार टीव्ही चॅनेल्सच्या किंमतीसंदर्भात न्यू टॅरिफ ऑर्डर (NTO)जाहीर करण्यात आली होती. यानंतर १ जानेवारी २०२०ला पुन्हा एकदा टॅरिफ ऑर्डर जाहीर केली होती. या ऑर्डरला NTO 2.0 असे संबोधण्यात आले. नव्या टॅरिफ ऑर्डर म्हणजे NTO 2.0 मुळेच विविध नेटवर्क आपल्या चॅनेलचे शुल्क वाढवत आहेत. ट्रायचे म्हणणे होते की NTO 2.0 मुळे प्रेक्षकांना फक्त त्याच चॅनेलचा पर्याय निवडता येईल आणि त्याच चॅनेलचे पैसे भरण्याचे स्वातंत्र्य मिळेल जे पाहण्याची त्यांची इच्छा आहे. सध्या प्रेक्षकांना एक पॅक विकत घ्यावा लागतो. यातील काही चॅनेल पाहण्यात प्रेक्षकांना रस नसतो मात्र संपूर्ण पॅक विकत घ्यावा लागत असल्यामुळे फक्त आवडीच्या चॅनेल निवडण्याचे आणि त्याचेच पैसे भरण्याचे स्वातंत्र्य प्रेक्षकांना सध्या नाही.

१ डिसेंबरपासून नवा निर्णय लागू

ट्रायच्या या निर्णयामुळे टीव्ही चॅनेल्सना आपले सर्वच चॅनेल पॅकच्या स्वरुपात रेटता येणार नाहीत. त्यामुळे आपले होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी चॅनेलचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक लोकप्रिय चॅनेल आपल्या पॅकमधून बाहेर काढून त्याचे वेगळे शुल्क आकारण्याचा कंपन्यांचा इरादा आहे. जर यापुढे तुम्हाला लोकप्रिय चॅनेल पाहायचे असतील तर ते तुम्हाला पॅकमध्ये मिळणार नाहीत. त्यासाठी वेगळे शुल्क मोजावे लागेल. नवीन निर्णय १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहे.

टीव्ही चॅनल्सशी न्यायालयात धाव

टेलिव्हिजन चॅनल ब्रॉडकास्टर्सनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ट्रायने NTO 2.0 आदेशाची घोषणा केल्यानंतर टीव्ही नेटवर्क कंपन्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. ट्रायच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. IBDF-Indian Broadcasting & Digital Foundation ने सर्वोच्च न्यायालयासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. यात म्हटले आहे की जी चॅनल सर्वात लोकप्रिय आहेत त्यांना पॅकेजमधून वेगळे करावे आणि त्यांच्या सध्याच्या शुल्कांपेक्षा ३० ते ५० टक्के अधिक शुल्क स्वतंत्रपणे लागू करता यावे. या प्रकरणाची सुनावणी २० नोव्हेंबरला आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तानसुरा ट्राय नवे टॅरिफ लागू करण्यावर ठाम आहे आणि न्यायालयानेदेखील अद्याप कोणतीही स्थगिती या निर्णयाला दिलेली नाही. अशा परिस्थितीत कंपन्या नवे शुल्क लागू करण्याची शक्यता आहे.

TV Channel Price Hike : Your entertainment will become costlier ; as TV channels to rise their charges

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात