नबाब मलिकांच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेने कोरोनाग्रस्त मृतांच्या दहनाचा निर्णय फिरवला; कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली

विशेष  प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाग्रस्तांचे निधन झाल्यास ते कोणत्याही धर्माचे असतील तरी त्यांच्या मृतदेहांचे दहनच करण्यात यावे. दफन करू नये. अंत्यविधीसाठी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी हजर राहू नये, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी काल काढले. परंतु, राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नबाब मलिक यांनी हस्तक्षेप केल्याने आयुक्त प्रवीण परदेशी काही तासांमध्ये हा आदेश मागे घेतला. स्वत: नबाब मलिक यांनी ट्विट करून काल सायंकाळी ही माहिती दिली. वास्तविक कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे वैद्यकीय कारणांसाठी दहन करावे. म्हणजे मृतदेहाला अग्नी द्यावा, असे निर्देश WHO जागतिक आरोग्य संघटनेने जारी केले आहेत. त्यानुसार जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे दहनच केले जात आहे. त्याच निर्देशानुसार व भारतातील साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांचे दहनच करण्याचे आदेश काढले होते. 

अंत्य संस्काराच्या वेळी मृतदेहाला स्पर्श होईल, असे विधी टाळावेत. यात कोठेही धर्माचा संबंध नाही, असेही स्पष्ट केले होते. परंतु, नबाब मलिक यांना महापालिकेचा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हा निर्णय रूचला नाही. ते प्रवीण परदेशी यांच्याशी बोलले. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. दफनविधीसाठी पुरेशी मोठी दफनभूमी असेल, तर दफन करण्यास हरकत नाही, असे फेरआदेशात नमूद करण्यात आले. ही माहिती देखील नबाब मलिक यांनी ट्विट करून दिली. संपूर्ण देश एकजूट होऊन कोरोनाच्या साथी विरुद्ध लढत असताना नबाब मलिक यांनी हस्तक्षेत करताना या विषयात अकारण धर्माचा संबंध आणल्याचे दिसत आहे. त्याच बरोबर WHO च्या निर्देशांची पायमल्लीही फेरआदेशात झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील पदाधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मुद्यावर  काय निर्णय घेतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात WHO च्या मार्गदर्शक सूचनांचाही विचार करण्यात आला आहे. : 

  • कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांना कोणाचाही कोणत्याही प्रकारे स्पर्श होता कामा नये. 
  • अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाला स्पर्श करावा लागेल, असे विधी टाळावेत. जसे की मृतदेहाला आंघोळ घालणे, मिठी मारणे, चुंबन घेणे हे प्रकार टाळावेत. कमीत कमी नातेवाइकांच्या उपस्थिती असावी. तेथेही एकमेकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे. 
  • मृतदेहांची उत्तरीय तपासणी टाळावी तसेच मृतदेह कुजू नये म्हणून त्याभोवती सुगंधी द्रव्ये फवारणेही टाळावे. 
  • मृतदेहावर लवकरात लवकर अंत्य संस्कार करावेत. मृतदेहावर कोरोना व्हायरसचे अस्तित्व नेमके किती काळ टिकून राहते, याचा डाटा अद्याप उपलब्ध झालेला नाही. 
  • शवागारीतील कर्मचारी वर्ग ज्या प्रकारे प्रतिबंधक काळजी घेतो, त्या प्रकारची काळजी घेण्याचा मृतांच्या नातेवाइकांनी प्रयत्न करावा. मृतदेहाचे पँकिंग, वाहतूक त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करावी.   
  • मृतदेहातून घातक द्रवपदार्थ, रसायने वाहण्याचा धोका असल्याने वॉटरप्रूफ शववाहिकेतून मृतदेहाची वाहतूक करण्यात यावी.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात