वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम : हाथरस प्रकरणात दंगली भडकवणारा पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयचा महासचिव रऊफ शरीफ याच्या बँक खात्यात ईडीला २.२१ कोटी रूपये असल्याचे आढळून आले. Enforcement Directorate finds Rs 2.21 crores
मनी लॉड्रिंग प्रकरण आणि हाथरस प्रकरणातील दंगलींमध्ये पोलिसांना हवा असलेल्या रऊफ शरीफला तो परदेशात पळून जात असताना काल केरळ पोलिसांनी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर अटक केली. तो ओमानला पळून चालला होता. त्याला ईडीच्या ताब्यात देण्यात आले आहे. Enforcement Directorate finds Rs 2.21 crores
रऊफ शरीफ याच्या बँक खात्यात ईडीला २.२१ कोटी रूपये आढळले आहेत. रऊफकडे उत्पन्नाचा कोणताही सोर्स नाही. अशा स्थितीत एवढी मोठी रक्कम त्याच्या बँक खात्यात कशी आली याचा तपास ईडी करीत आहे. तसेच एवढी मोठी रक्कम तो नेमकी कोठे खर्च करीत होता किंवा करणार होता याचाही कसून शोध घेतला जात आहे.
यापूर्वीही रऊफच्या बँक खात्यात अशीच मोठी रक्कम आढळली होती. हाथरस प्रकरणानंतर काही ठिकाणी दंगली घडविण्यासाठी यातील रक्कम खर्च झाली का, यांचा उत्तर प्रदेश पोलिस तपास करत आहेत. तसेच या २.२१ रूपयांचा नेमक्या सोर्सचा ईडी तपास करीत आहे.
रऊफच्या विरोधात मनी लॉड्रिंग अर्थात पैशाच्या अफरातफरीची केस चालू आहे. ईडी त्या प्रकरणाचाही तपास करत आहे. ईडी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या विरोधात अनेकदा तपासाच्या आणि चौकशीच्या नोटिसा जारी केल्या परंतु, त्यापासून दूर पळत होता. त्याने अनेकदा राहण्याची ठिकाणे बदलल्याचेही लक्षात आले. काल दुपारी तिरूअनंतपूरम विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ईडीच्या अलर्टनुसार त्याला केरळ पोलिसांनी रोखले.
रऊफकडून ओमानची काही कागदपत्रे, क्रेडिट कार्ड आणि अन्य कादगपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्याला ईडीच्या ताब्यात दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App