राहुल गांधींचे अध्यक्षपद एनडीच्याच पथ्यावर; पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा

  • रामदास आठवलेंचा काँग्रेसला न मागता सल्ला

विशेष प्रतिनिधी 

नागपूर : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास एनडीएच्या फायद्याचेच आहे. त्यांच्यामुळे एनडीएला चांगली संधी मिळते. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करून आधी झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करावे, असा न मागता सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला. त्याचबरोबर शरद पवार एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, असा दावाही त्यांनी केला. ramdas athwale pitches for sharad pawarनागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. प्रफुल्ल पटेल यांनी लिहिलेल्या लेखाशी आठवले यांनी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, ‘पवारांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्यपध्दतीने वागत नव्हते. ramdas athwale pitches for sharad pawar

दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसला आहे. त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.

ramdas athwale pitches for sharad pawar

आठवले म्हणाले…

  • अंबानी आणि अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांच्या फायद्यासाठी हे कृषी कायदे तयार करण्यात आल्याचा समज खोटा आहे.
  • आगामी निवडणूकीत मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार होईल. भाजपसोबत रिपाईची युती असेल. गेल्यावेळी भाजपने ८२ जागा जिंकल्या. शिवसेनेला ९४ मिळाल्या. आता रिपाई सोबत असेल. त्यामुळे भाजपला बहुमत मिळेल. भाजपचा महापौर तर, रिपाईचा उपमहापौर होईल.
  • यापुर्वी कॉंग्रेससोबत युती असताना रिपाईला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी रिपाईचे चंद्रकांत हंडोरे महापौर झाले होते. महापालिका निवडणुकीत कितीही एकत्रित लढण्याचे दावे करण्यात आले तरी, काँग्रेस शेवट वेगळी लढेल.
  • अॅड. प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाई ऐक्य होत नाही. त्यामुळे आम्ही आमचा रिपाई पक्ष बळकट करण्याचर भर दिला आहे. आमचा निळा झेंडा आणि नाव कायम आहे. अॅड. आंबेडकरांनी झेंडा आणि नावही बदलले. त्यांची ऐक्याची मानसिक तयारी नाही. त्यामुळे आता रिपाई ऐक्य होणे नाही. परंतु, आंबेडकर यांनी एनडीएत आल्यास त्यांनाही चांगली संधी असेल. समाजालाही फायदा होईल

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*