देशात २१ दिवसांचे लॉक डाऊन : पंतप्रधानांची घोषणा; कोरोना वैद्यकीय सुविधांसाठी १५ हजार कोटींचीही तरतूद

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : अक्राळ विक्राळ कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात तब्बल २१ दिवसांचे लॉक डाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ८.०० वाजता केली.  कोरोनाविरोधातील लढाईच्या वैद्यकीय उपचार, उपकरणांसाठी १५ हजार कोटींच्या तरतुदीची घोषणा त्यांनी केली.  नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत होते. ते म्हणाले, ” कोरोनाविरोधातील  जनता कर्फ्यूत संवेदनशीलतेने योगदान केले. मानवतेवर संकट येते तेव्हा सर्व भारतीय एकजूट दाखवतात. मी आपली प्रशंसा करतो. कोरोना महामारीने जगाला ग्रासले आहे. विकसित देशांना महामारीने हैराण केले आहे. ते देश प्रयत्न करताहेत. पण महामारीचे संकट वाढते आहे. दोन महिन्सांता अभ्यास असे सांगतो एकच उपास आहे, सोशल डिस्टंसिंग, घरातच थांबणे कोरोना फैलावाविरोधात हाच एक मार्ग आहे.

कोरोना फैलावाची साखळी तोडलीच पाहिजे. सोशल डिस्टंसिंग पंतप्रधानांसकट सगळ्यांसाठी आहे. काहींचा गैरसमज, बेजबाबदार वर्तणूक देशाला संकटात टाकते. या वर्तणुकीची किंमत चुकवावी लागेल. ही किंमत किती चुकवावी लागेल, याचा अंदाजही येणार नाही. आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉक डाऊन होणार आहे. आपल्याला, कुटुंबाला, देशाला वाचवण्यासाठी हे लॉक डाऊन करण्यात येणार आहे. हे जनता कर्फ्यूपेक्षा अधिक कठोर आहे. याची आर्थिक किंमतही चुकवावी लागेल. पण आपल्याला वाचविणे हे माझे प्राधान्य आहे. आपण जेथे असाल तेथेच राहा.

२१ दिवसांसाठी पूर्ण लॉक डाऊन राहिल. कोरोना फैलाव रोखण्यासाठी आवश्यक आहे. मी आज पंतप्रधान नाही, मी तुमच्या घरातील सदस्य म्हणून बोलतो आहे. या लॉक डाऊनने घरापुढे लक्ष्मणरेषा आखली आहे. अक कोरोना संक्रमित व्यक्ती हजारोंना संक्रमित करू शकते, हे लक्षात घ्या. माझी हात जोडून प्रार्थना आहे, घरातच राहा. सोशल मीडियावर “कोई रोड पर ना निकले,” हा बँनर मला खूप आवडला. एक व्यक्ती ही महामारी फैलावते. WHO चा आकडा महत्वाचा आहे. पहिले १ लाख ६७ दिवस, ११ दिवसात अजून १ लाख संक्रमिक झाले. दोन लाखांतून तीन दिवसात आणखी फैलावला. प्रगत देशात व्यवस्था उत्तम आहेत पण ते कोरोना फैलाव रोखू शकले नाहीत. कोरोनापासून बचावाचा मार्ग कोणता? त्यांनी सरकारी निर्देशांचे पालन केले. आपल्यापुढे एकच मार्ग आहे. एषा पंथा:  सोशल डिस्टंसिंग…!! कोरोनापासून तेव्हाच बचाव होईल, आपण घराची लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही. हा आमचा संकल्प असला पाहिजे. संयम पाळा. जान है तो जहाँन है. संयम आणि स्वयंशिस्त पाहिजे. मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो. आपण डॉक्टर, नर्स, पँथॉलॉजिस्ट, पोलिस, आर्मी, हॉस्पिटल, अँम्युलन्स ड्रायवर, वॉर्ड बॉइज, सफाई कर्मचारी यांच्यासाठी प्रार्थना करा. या सगळ्यांचा विचार करा. ते कर्तव्य करताहेत. कोरोना जगव्यापी महामारी आहे. सरकारे चोवीस तास काम करत आहेत. आवश्यक वस्तू पुरविल्या जातील. गरीबांसाठी हा संकटाचा क्षण आहे.

गरीबांच्या मदतीसाठी आपण सर्व साथीदार आहोत. जीवन वाचवण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता द्या. आरोग्य तग्यांनी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे. कोरोनाची वैद्यकीय सामग्री यातून वाढविली जाईल. राज्य सरकारांचे प्राधान्स आरोग्य सेवाच पाहिजे. खासगी क्षेत्रही सरकारबरोबर काम करत आहे.  अफवा फैलावू नका. अफवा, अंधविश्वास फैलावू नका. सरकारच्या सूचनांचे पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका. २१ दिवसांचे लॉक डाऊन आपल्या रक्षणासाठी हाच एकमेव मार्ग आहे. आपण आत्मविश्वासाने यातून बाहेर येऊ”.


… यांना निर्बंधनातून सवलत

1. किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये
2. किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या
3. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
4. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.
5. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
6. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात
7. बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा
8. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण
9. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
10. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
11 उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
12. औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी
13. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक
14. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था
15. टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा
16. पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे
17. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था
18. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.
19. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी
20. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी लक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
21. अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात