कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ८० कोटी जनतेला २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किला दराने तांदूळ सरकारतर्फे दिला जाणार आहे. गव्हाची बाजारातील किंमत २७ रुपये तर तांदळाची ३७ रुपये आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ८० कोटी जनतेला २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किला दराने तांदूळ सरकारतर्फे दिला जाणार आहे.गव्हाची बाजारातील किंमत २७ रुपये तर तांदळाची ३७ रुपये आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. दर महिन्याला सात किलो धान्य दिले जाणार आहे. आगामी तीन महिन्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारांना ही धान्याची मदत पाठविली जाणार आहे.
पंतप्रधानांनी मंगळवारी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केल्यावर जनतेसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी युध्द पातळीवर बैठकांचे आयोजन केले. मंत्रीमंडळाची आजची बैठकही ‘सोशल डिस्टन्सिंग’चा विचार करून झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली.
कोरोना विरुध्दच्या लढाईत लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, या काळात जनतेला त्रास होऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी उपाययोजना केल्याचे जावडेकर यांनी सांगिातले. सरकारने नोकरदारांनाही सरकारने दिला आहे. सरकारी संस्थांमध्ये असलेल्या कंत्राटी कामगारांना पगार दिला जाणार आहे. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. किमान वेतन देण्यास सांगण्यात आले आहे, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारांनीही आपल्या योजना तयार केल्या आहेत. रोजंदारीवरील मजुरांसाठीही मोफत धान्याची योजना आखली जात आहे. केवळ गरीबांनाच नव्हे तर सर्वांनाच धान्याचा पुरेसा पुरवठा केला जाणार आहे. जावडेकर म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केलं की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसंच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे.
आजपर्यंत जगभरात १६ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.. त्यामुळे थोडा त्रास झाला तर तो सहन केला तो आवश्यक आहे. आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारेही आहेत असे जावडेकर यांनी सांगितले. खरेदी करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. एकमेंकांत अंतर ठेवावे, असे आवाहनही प्रकाश जावडेकर यांनी केले.
गुजरातमधील आणंद येथे दुकानांसमोर तीन फुटांचे बॉक्स केले गेले आहेत. त्यातमध्ये नागरिक उभे राहून खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग सर्वत्र करावा, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App