महाआघाडी सत्तेवर आली; जैतापूर, नाणार प्रकल्पांबाबत शिवसेनेने भूमिका बदलली


विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : कोकणात विनाशकारी प्रकल्प नको, अशी भूमिका मागच्या भाजप – शिवसेना युतीच्या सरकारमध्ये घेणाऱ्या शिवसेनेने स्वतःच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार येताच यू टर्न घेऊन भूमिका बदलली आहे. आता शिवसेनेला नाणार रिफायनरी प्रकल्प आणि जैतापूर अणूप्रकल्प चालणार आहेत. सत्तेमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसताच शिवसेनेची अशी भूमिका बदलली आहे.  Shiv Sena changed its position regarding Jaitapur  Nanar projects

नाणार, जैतापूर प्रकल्प स्थानिकांना हवा आहे. शिवसेना स्थानिकांच्या मताशी सहमत आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी केले आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. ९० टक्के स्थानिकांनी जागेचा मोबदला स्वीकारला असल्याने आता त्याबाबतीतील भूमिका केंद्र सरकार घेईल, असे सांगण्यात येत आहे. shiv Sena changed its position regarding Jaitapur  Nanar projects

नाणार प्रकल्पाबाबतही स्थानिकांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिकांचे मत महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांच्या विरोधामुळेच तेव्हा या प्रकल्पाची अधिसूचना शिवसेनेने रद्द केली होती. परंतु आता स्थानिकांचे मत बदलले आहे. राज्यात सत्तेत आल्यानंतर नाणारबाबत शिवसेनेची भूमिकाही बदलली आहे. झी २४ तासने ही बातमी दिली आहे. पण मूळात महाआघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवारांना प्रकल्पांविरोधात भूमिका घेतलेली चालणार नाही, म्हणून शिवसेनेने आपलीही भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

shiv Sena changed its position regarding Jaitapur  Nanar projects

नाणार प्रकल्पाबाबतही स्थानिकांचा विरोध मावळला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिकांचे मत महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांच्या विरोधासोबत शिवसेना होती. आता स्थानिकांनी भूमिका बदलल्याने शिवसेनेनेही आपली भूमिक बदलली आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत आल्यानंतर नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली, अशी चर्चा सुरु झाली आहे.

नाणार तेलशुद्धीकरण कारखाना

जगातील सर्वाधिक तेल उत्पादन (Refinery project) करणार्‍या सौदी अरेबियाच्या ‘आरामको’ कंपनीने दिल्लीत सामंजस्य करारावर सह्या केल्या होत्या. या करारानुसार राजापूर येथील नाणार येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar Refinery project) प्रस्तावित आहे. हा प्रकल्पाला स्थानिकांनाविरोध होता. स्थानिकांसोबत आपण असणार असे शिवसेनेने जाहीर केले होते. मात्र, तीव्र विरोधानंतर शिवसेनेने हे प्रकल्प नको, अशी भूमिका घेतली होती. या प्रकल्प कामाला सुमारे १६ हजार एकर जमिनीची गरज लागणार आहे.

सुमारे तीन लाख कोटी रुपये खर्च होणारा राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावच्या परिसरात महत्त्वाकांक्षी तेलशुद्धीकरण कारखाना आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांचा प्रकल्प बांधण्याचे ठरले आहे. या प्रकल्पाची शुद्धीकरण प्रक्रिया-क्षमता दरवर्षी ६० दशलक्ष टन क्रूड तेल बॅरल इतकी असेल आणि त्याचबरोबर पेट्रोकेमिकल्स पदार्थांचे उत्पादन देशातील ३० टक्क्यांपर्यंत असेल. या प्रकल्पाकरिता जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण