तुमची नाईट लाइफ चालते; जनतेला मात्र ‘करो’ना, मनसेची सडकून टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रात्रीच्या संचारबंदीवर मनसेने सडकून टीका केली आहे. MNS takes on thackeray – pawar govt over night life issue

“मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचे कारण काय आहे?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे विचारले आहेत. MNS takes on thackeray – pawar govt over night life issue

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी ‘करो’ना, अशा शब्दांत मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

MNS takes on thackeray – pawar govt over night life issue

“तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे” असा टोलाही देशपांडेंनी ठाकरे – पवार सरकारला लावला.

व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचे नाही, हे कोणते लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी केला आहे. “लॉकडाउनमुळे यावर्षी लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर मग अमेरिकेसारखे बडे पॅकेजही द्या” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात