“पोलिटिकल अँजिओग्राफी इज सक्सेसफुल, बट पोलिटिकल सर्जरी हॅज फेल्ड सो फार”

  • पटेल, राऊतांच्या कार्डिओलॉजीचे निदान आणि पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानातील ब्लॉकेजेस

शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या राजकीय हृदयस्थानची अर्थात पंतप्रधानपदाची “पोलिटिकल अँजिओग्राफी” प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत या दोन राजकीय डॉक्टरांनी केली. तिचे निदान आणि निष्कर्ष समान असले तरी मूळ “पोलिटिकल बायपास सर्जरी” केल्याशिवाय पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयातले ब्लॉकेजेस कसे निघणार? तशी सर्जरी करण्याची पवारांची क्षमता आहे का? हे प्रश्न उरतातच…


विनायक ढेरे

सर्वसामान्य वैद्यकीय अँजिओग्राफीतून हृदयविकाराचे निदान होते. ब्लॉकेजेस नेमके किती आणि कुठे आहेत ते समजते. कोणत्या प्रकारची सर्जरी हृदयावर करणे आवश्यक आहे, याचा निर्णय घेता येतो. अँजिओप्लास्टी पुरेशी होईल की बायपासच करावी लागेल याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यास अँजिओग्राफी उपयोगी ठरते. पण अँजिओग्राफी कितीही यशस्वी झाली तरी तो हृदयविकारावरचा खरा उपचार नव्हे. खरा उपचार अँजिओप्लास्टी अथवा बायपास सर्जरी हाच असतो. आणि तो उपचार करण्यासाठी निष्णात सर्जनची गरज असते. त्या सर्जनने आवश्यक सर्जरी करून ती यशस्वी व्हावी लागते तेव्हा कुठे पेशंटच्या हृदयाचा रक्तपुरवठा, पल्स, पंपिंग व्यवस्थित होते. sharad pawar political career analysis

पण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानाची गेल्या ३० वर्षांची “मेडिकल पोलिटिकल हिस्टरी” बघता त्यांच्या बाबतीत असे म्हणावे लागते, “पोलिटिकल अँजिओग्राफी इज सक्सेसफुल बट पोलिटिकल सर्जरी हॅज फेल्ड सो फार”. कारण खुद्द पवारांना स्वतःच्या कारकिर्दीच्या हृदयस्थानावर यशस्वी राजकीय सर्जरी करणे जमलेले दिसत नाही.


त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृहयस्थानात अन्य नेत्यांनी घुसविलेले ब्लॉकेजेस त्यांचे त्यांनीच राजकीय सर्जरी करून दूर करणे आवश्यक होते. त्यांनी तसे भरपूर प्रयत्न केले. पण किरकोळ राजकीय अँजिओप्लास्टीपेक्षा मोठी सर्जरी त्यांना करता आल्याचे दिसत नाही.

खरे म्हणजे पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानाचे फंक्शनिंग नीट चालावे, रक्तपुरवठा आणि पंपिंग त्यांना हवे तसे चालावे यासाठी बायपास सर्जरीची आणि तीन किंवा चार ग्राफ्ट टाकण्याची आवश्यकता होती. पण पवार तेवढे मोठे सर्जन नसल्याने त्यांना त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीच्या हृदयस्थानाची बायपास सर्जरी व्यवस्थित जमलेली दिसत नाही.याचा रोकड्या राजकीय भाषेतला अर्थ काँग्रेसमध्ये राहुन त्यांना गांधी फॅमिलीला बायपास करता आलेले नाही. एवढेच काय पण आधी नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांनाही कधी पवार बायपास करू शकलेले नाहीत, असा होतो. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नरसिंह राव, केसरी यांनी पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदसस्थानत ब्लॉकेजेस निर्माण केले होते, हे खरेच… पण ते दूर करण्याची जबाबदारी अन्य कोणत्या राजकीय सर्जनची नव्हती, तर स्वतः पवार नावाच्या सर्जनची ती होती. त्यांना तशी राजकीय सर्जरी जमली नाही, ही वस्तूस्थिती आहे.

sharad pawar political career analysis

आज प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊतांनी केलेली अँजिओग्राफी वेळोवेळी पवारांच्या जवळच्या अनेक पत्रकारांनी केली होती. त्या अँजिओग्राफीतून राजकीय ब्लॉकेजेसचे निदानही आजच्या इतकेच व्यवस्थित झालेले दिसत होते. पण तेव्हाही सर्जरी सक्सेसफुल करता आली नव्हती. कालांतराने त्यातील नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांचे दोन ब्लॉकेजेस दूर देखील झाले. पण मूळ बायपास सर्जरी तेव्हा यशस्वी होऊ शकली नाही. खरे म्हणजे अद्यापही ही बायपास सर्जरी पवार यशस्वीपणे करू शकलेले नाहीत. त्यामुळे पवारांच्या राजकीय हृदयाचा रक्तपुरवठा राजकीय वैद्यकीयदृष्ट्या त्यांना स्वतःला हवा तसा सुरळित होताना दिसत नाही.

नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्या रूपातील ब्लॉकेजेस दूर झाले असले तरी एक जुना ब्लॉक तसाच असून नवे ब्लॉकेजेसही तयार झालेले दिसताहेत. किंबहुना पटेल आणि राऊत यांनी कालची अँजिओग्राफी नवे ब्लॉकेजेस त्यांनी पवारांच्य राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानी सोडल्याचे दिसत आहेत. त्याचे परिणाम कदाचित काही दिवसांमध्ये दिसतील. पण त्याने पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानावर परिणाम होण्यापेक्षा महाआघाडी सरकारच्या सध्याच्या हृदयस्थानावर अर्थात मातोश्रीवर होण्याची शक्यता अधिक वाटते.

पटेल आणि राऊतांच्या अँजिओग्राफीच्या निदानातून सर्जन पवारांना कदाचित मातोश्रीवर बायपास सर्जरी करायची असावी. कारण पवारांना दिल्लीतली बायपास सर्जरी जमली नसली तरी महाराष्ट्रातली बायपास सर्जरी त्यांना जमते, हे मात्र नक्की…!!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*