रामदास आठवले म्हणाले, वानखेडे कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभा राहणार, जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानेच मलिकांचे आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा जाहीर केला आहे.Ramdas Athavale says will stand firmly behind Wankhede and his family, Malik doing allegations because of his son in laws arrest in a drugs case

समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी रविवारी रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी वानखेडे कुटुंबीय आणि आठवले यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्याला त्यांचे सर्व कागदपत्र दाखवल्याचे आठवले यांनी सांगितले. ते म्हणाले, समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे.



ते मुस्लिम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केलं आहे. त्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिमच आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्याचबरोबर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीचेही आरोप करण्यात आले आहेत. वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर ठामपणे आपल्या पतीच्या पाठीशी उभ्या असल्याचे सांगितले.

आठवलेंसोबत झालेल्या भेटीपूर्वी क्रांती रेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. आमच्या अडचणी त्यांना सांगू. त्यांनी यापूवीर्ही आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी अपेक्षा आहे.

नवाब मलिक यांनी रात्री यास्मिन वानखेडे यांच्याबद्दल ट्विट केलं आहे, त्याबाबत काय म्हणणं आहे? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना आम्हाला त्यांच्यासाठी वेळ नाही, असे क्रांती रेडकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली आहे.

Ramdas Athavale says will stand firmly behind Wankhede and his family, Malik doing allegations because of his son in laws arrest in a drugs case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात