Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत सांगितली “मेड इन चायना”ची कहाणी; पण इज्जत आपल्याच खानदानी सरकारांची काढली!!

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या अभिभाषणावरच्या चर्चेत “मेड इन चायना”ची कहाणी सांगितली, पण ही कहाणी सांगताना आपला देश उत्पादन करताना फेल झाला असे सांगत आपल्याच खानदानी सरकारांची त्यांनी इज्जत काढली!!

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेची सुरुवात राहुल गांधींनी जोरदार केली. त्यांनी मोदी सरकारला विविध धोरणांवर घेरले. पण हे करताना त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या. त्या स्टोरी टेल एप वर शोभणाऱ्या ठरल्या!! भाषणाच्या ओघातच त्यांनी “मेड इन चायना”ची कहाणी सांगितली.

– राहुल गांधी म्हणाले :

– कुठल्याही देशाचे सरकार एकीकडे ग्राहक तयार करते आणि दुसरीकडे उत्पादन करते. 1990 नंतरच्या दशकांमध्ये प्रत्येक सरकारांनी आपल्या देशात ग्राहक तयार करायचे काम खूप उत्तम केले. देशातले कंजम्शन त्या सरकारांच्या धोरणामुळे वाढले. उबर, रिलायन्स, अदानी हे ग्राहक उपयोगी सेवा देतात. त्यामध्ये आपण पुढे गेलो. पण एक देश म्हणून आपण उत्पादन क्षेत्रात खूप मागे पडलो. आपल्या देशामध्ये महिंद्रा, बजाज टाटा यांच्यासारखे मोठे उत्पादक आहेत. त्यांना सपोर्ट करण्यात आपण मागे पडलो म्हणून आज आपण जी उत्पादने वापरतो, ती सगळी “मेड इन चायना” आहेत. मोबाईल फोन आपण “मेड इन चायना”चा वापरतो. आपण तो भारतात बनला, असे सांगतो. परंतु तो “असेंबल्ड इन इंडिया” आहे. कारण त्या मोबाईल फोन मधले कॉम्पोनेंट्स आणि नेटवर्क “मेड इन चायना” आहेत. आपण मेड इन बांगलादेश टी-शर्ट वापरतो, मेड इन चायना चड्ड्या वापरतो, त्यावेळी आपण सगळा टॅक्स चीनला देत असतो.

राहुल गांधींनी या संपूर्ण भाषणामध्ये देशाच्या आर्थिक धोरणाची चिकित्सा जरूर केली. त्यांनी 1990 नंतरची परिस्थिती सांगितली, त्यात तथ्य देखील दिसले. परंतु त्यांनी आपण उत्पादन क्षेत्रात फेल गेलो असे सांगताना त्यांनी कुठल्या सरकारची नावे घेतली नाहीत, तर त्यांनी थेट देशावरच अपयशाचा ठपका ठेवला, जो वास्तवात चुकीचा ठरला. कारण राहुल गांधी 1990 च्या आधीच्या सरकारांविषयी बोलले नसले, तरी ती सरकारे प्रामुख्याने त्यांच्या खानदानाचीच सरकारे होती. ज्यांच्या राजवटीत लायसन्स राज आणि लालफीत शाही यांनी संपूर्ण देशामध्ये गोंधळ घातला होता. राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या सगळ्या कंपन्यांना उत्पादनाची छोटी मोठी परवानगी मिळवण्यासाठी दिल्ली – मुंबईचे खेटे घालावे लागत होते. हे सगळे नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारांच्या काळातील मिश्र अर्थव्यवस्थेच्या धोरणाचे सांगाडे होते. मात्र, राहुल गांधींनी चलाखी करून आपल्या भाषणामध्ये नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्या सरकारांची नावे घेतली नाहीत, तर त्यांनी देशालाच अपयशी ठरवले, जे वास्तवाच्या निकषावर खोटे ठरले!!

कारण देशातल्या मोठ्या उत्पादक कंपन्यांना लायसन्स राज मध्ये आणि लालफीत शाहीमध्ये अडकवण्याचे काम देशातल्या जनतेने केले नव्हते, तर ते गांधी खानदानाच्या विविध सरकारांनीच केले होते. हा नजीकच्या भूतकाळातला इतिहास आहे, तो मात्र राहुल गांधींनी सांगितला नाही.

Rahul Gandhi says Any country basically organizes two things, you can organize consumption and then you can organize production.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात