विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत संविधान या विषयावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बदनामीचे वार केले. मात्र, केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जोरदार पलटवार करून सावरकरांच्या बदनामीचा वैचारिक बदला घेतला.Rahul Gandhi defames Savarkar in Lok Sabha while discussing the Constitution; Kiran Rijiju + Srikant Shinde +, Nishikant Dubey’s Counterattack!!
संविधानावरील चर्चेचा रोख राहुल गांधींनी लोकसभेत आज सावरकरांच्या बदनामी वळवला. आधी राहुल गांधी सावरकरांना फक्त माफीवीर म्हणून बदनामी करत होते. पण आज त्यापलीकडे पाऊल टाकून राहुल गांधींनी सावरकरांना मनुस्मृतीचे समर्थक ठरविले. सावरकर देशाच्या राज्यघटनेचे नव्हे, तर मनुस्मृतीचे समर्थक होते असा दावा करून राहुल गांधींनी त्यांच्या पुस्तकातला एक अर्धवट कोट वाचून दाखविला. मनुस्मृती हा देशाचा पुरातन काळापासून आलेला कायदा आहे. देशाच्या संविधानात “भारतीय” म्हणावे असे काहीही नाही, असे सावरकरांनी लिहिल्याचा दावा राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींच्या या भाषणावर संसदेत जोरदार गदारोळ झाला सत्तारूढ पक्षाच्या अनुराग ठाकूर, श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबे वगैरे खासदारांनी राहुल गांधींचा जोरदार समाचार घेतला. केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी इंदिरा गांधींचे पत्र ट्विट करून त्यांचे सावरकरांविषयीचे विचार राहुल गांधींना सुनावले. श्रीकांत शिंदे यांनी भर सभागृहात इंदिरा गांधींचे ते पत्र वाचून दाखविले. आता बोला, इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का??, असा परखड सवाल श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींना विचारला. त्याचवेळी राहुल गांधींचे सावरकरांच्या बदनामीचे उद्गार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांना मान्य आहेत का असा बोचरा सवाल देखील श्रीकांत शिंदे यांनी त्यांना विचारला.
Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju tweets, "This document is for Rahul Gandhi Ji as he made an incorrect statement in Lok Sabha about Veer Savarkar. Indira Gandhi." pic.twitter.com/E8Q7zes1xp — ANI (@ANI) December 14, 2024
Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju tweets, "This document is for Rahul Gandhi Ji as he made an incorrect statement in Lok Sabha about Veer Savarkar. Indira Gandhi." pic.twitter.com/E8Q7zes1xp
— ANI (@ANI) December 14, 2024
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशासाठी त्याग एवढा मोठा आहे की, कुठला राहुल गांधी सावरकरांसारखा बनूच शकत नाही, असा टोला निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना हाणला. राहुल गांधींनी संविधानावरील चर्चेचा सगळा रोख सावरकरांच्या बदनामीकडे वळविल्याने सत्तारूढ पक्षाकडून देखील तितक्याच परखड शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App