वेदांत अग्रवालच्या वकिलांचेही “पवार कनेक्शन”; आरोपांची उत्तरे द्यायला सुप्रिया सुळे पुढे आल्या चार दिवसानंतर!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : बड्या बापाचा बेटा पुणे हिट अँड रन प्रकरणात अडकला असताना विशाल अग्रवाल आणि पवार कुटुंब यांच्यातले व्यावसायिक संबंध हा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. वेदांत अग्रवालने दारू पिऊन वेगात गाडी चालवून दोघांचा बळी घेतला. परंतु त्या मुद्द्यावर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे दोघेही बोलायला किंवा प्रतिक्रिया व्यक्त करायला पुढे आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर संशयाचे मळभ निर्माण झाले.Pawar connection of Vedant Aggarwal lawyers too After four days Supriya Sule came forward to answer the allegations

एरवी कुठल्याही मुद्द्यावर उठसूठ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यासाठी सतत पुढे येणाऱ्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे गप्प का??, शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाही?? आग्रवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत?? असे सवाल तयार झाले. आरोपी वेदांत अग्रवाल याला दिलेला वकील प्रशांत पाटील याचे पवार कुटुंबियांशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी कनेक्शन असल्याची माहिती समोर आली.



या संदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन “अग्रवाल – पवार कनेक्शन” उघड्यावर आणले. त्याचबरोबर विशाल पाटील या कार्यकर्त्याला वकीलपत्र देऊन पवारांची राष्ट्रवादीच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला. एरवी महाराष्ट्रातल्या कुठल्याही किरकोळ प्रकरणांमध्ये सुप्रिया सुळे फडणवीस यांचा राजीनामा मागतात, पण वेदांत अग्रवाल हीट अँड रन केस मध्ये त्या गप्प आहेत, या नसेवर नितेश राणे यांनी बोट ठेवले.

वेदांत अग्रवाल हिट अँड रन केस प्रकरणात पवार आणि अग्रवाल यांचे कनेक्शन समोर आल्यानंतर 4 दिवसांनी सुप्रिया सुळे खुलासा द्यायला पुढे आल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या :

काल मी बारामतीत होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी राजकीय दबावात येऊ नये असं म्हटलं, पण राजकीय दबाव कोण टाकत आहे?? कोणी फोन केला?? कोणामुळे बेल मिळाली?? हे समोर यायला हवे. राजकीय दबाव सत्ताधारीच आणू शकतात.

300 शब्दात निबंध लिहा ही चेष्टा आहे, हे असंवेदनशील सरकार आहे. रोड सेफ्टी बद्दल कोणीच बोलत नाही. माझा आरोप आहे हा मोठा गुन्हा आहे. ज्यांनी फोन केला असेल ते ही समोर आले पाहिजे. घटना घडल्यानंतर जे आमदार पोलीस स्टेशनला गेले होते त्याचं उत्तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. आरोपी मुलाचं आयकार्ड का तपासलं नाही. 17 वर्षांच्या मुलाला दारू देता कशी?? त्याला कार चालवायला देताच कशी??

आणखी धक्कादायक माहिती उघड

पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड होता. असं असतानाही विशाल अग्रवालने ती गाडी मुलाच्या ताब्यात दिल्याची बाब उघड झाली. इतकंच नाही तर, ‘मुलानं कार चालवायला मागितली तर त्याला चालवू दे.. तू बाजूला बस’ अशी सूचना विशाल अग्रवालनं त्याच्या चालकाला दिली होती, असं पोलिसांनी कोर्टात सांगितले. विशाल अग्रवाल हे अपघातात आरोपी असलेल्या मुलाचे वडील आहेत. त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी युक्तिवाद करताना सरकारी पक्षाच्या वतीने विशाल अग्रवालच्या विरोधात बाजू मांडण्यात आली.

Pawar connection of Vedant Aggarwal lawyers too After four days Supriya Sule came forward to answer the allegations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात