विशेष प्रतिनिधी
मुंबई : फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; यात भाजप आणि काँग्रेस राहिलेत नामानिराळे!!, असे आजचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे. NCP and shivsena
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटले त्यांचे नेते वेगवेगळ्या विषयांवरून एकमेकांचेच वाघाडे काढत आहेत कृषी घोटाळ्यासंदर्भातला विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला. त्यावर कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. हा कृषी घोटाळा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या काळात झाला. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती, तोपर्यंत सुप्रिया सुळे यांना कृषी खात्यात भ्रष्टाचार झाला, असे कधी वाटले नव्हते, पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांना लगेच कृषी खात्यातला घोटाळा दिसला आणि तो नेमका “राष्ट्रवादी संस्कारित” कृषिमंत्र्यांच्या काळातला निघाला. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरच भ्रष्टाचाराचा वेगळ्या संदर्भात आरोप केला.
कृषी खात्यातल्या घोटाळ्यावरून एकीकडून राष्ट्रवादीतलीच भांडणे चव्हाट्यावर आली तशीच खिचडी घोटाळ्यावरून दोन शिवसेनेने मधली भांडणे चव्हाट्यावर आली. खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाणला जामीन मिळाल्याबरोबर तो बाहेर आला आणि त्याने मातोश्री गाठली. हा खरा आमचा पठ्ठा शिवसैनिक. बाकीचे ईडी, सीबीआयला घाबरले, पण हा घाबरला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सुरज चव्हाणला मिठी मारली. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांना टोला हाणला. जेलमध्ये जाऊन भेटायला वेळ नाही. तिथे जायची भीती वाटते आणि सुरज बाहेर आल्याबरोबर त्याला मिठीत घ्यायला लाज वाटत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. शिवसेना एक असताना शिरसाट यांनी कधी आपल्याच पक्षाच्या नेत्याची लाज काढल्याचे आढळले नव्हते.
पण दोन पक्ष फुटताच त्यातले घोटाळे बाहेर आले आणि फुटलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचेच वाभाडे काढले. या सगळ्यात भाजप आणि काँग्रेस हे दोन बडे पक्ष नामानिराळे राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App