
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताशिवाय बांगलादेशातील परिस्थिती सुधारू शकत नाही, असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा ( Minister Manik Saha ) यांनी म्हटले आहे. शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त एका सरकारी कार्यक्रमात बोलताना साहा म्हणाले की, बांगलादेशच्या लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी भारताचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे.
ते म्हणाले, ‘बांगलादेशबद्दल बोलण्यात अर्थ नाही, भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शकत नाही. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सैन्याने किती बलिदान दिले आणि आपल्या लोकांनी किती मदत केली हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हे विसरता कामा नये
साहा म्हणाले की, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगेन की, त्रिपुरातील जनतेने तुमच्या स्वातंत्र्यासाठी कशी मदत केली हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही शक्य ती सर्व मदत केली… बांगलादेशात जी परिस्थिती आहे, ती जास्त काळ टिकू शकत नाही.
Minister Manik Saha said that the condition of Bangladesh cannot improve without India
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बड्या – बड्या गोष्टी; पण संघटनेत बेरजेपेक्षा वजाबाकीच मोठी!!
- Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी
- Jagan Mohan Reddy : प्रसादाच्या लाडूतील भेसळीचा वाद अंगावर आला; जगन मोहन रेड्डींनी राजकीय नौटंकी करत तिरुपतीचा दौरा रद्द केला!!
- Indonesia : सोन्याच्या खाणीत खोदकाम करणे जीवावर बेतलं, दरड कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू