जाणून घ्या, नेमके कोण आहेत महताब? आणि त्यांनी बीजेडी सोडून भाजपमध्ये प्रवेश का केला? Lok Sabha Pro-tem Speaker Bhartrihari Mahtab sworn in by the President
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ओडिशामधील कटक येथील भाजप खासदार भर्तृहरि महताब यांना लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. आता प्रोटेम स्पीकरच सर्व खासदारांना शपथ देतील. जाणून घ्या कोण आहेत भर्तृहरी महाताब? त्यांनी बीजेडी सोडून भाजपमध्ये प्रवेश का केला?
कटक लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा खासदार राहिलेल्या महताब यांनी २२ मार्च रोजी बीजेडीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. बीजेडीमध्ये स्वतंत्रपणे काम करण्याची पुरेशी संधी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. महताब यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही दिवसांनी बीजेडीने महताब यांचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट रद्द केले होते. कटकमध्ये महताबच्या जागी बीजेडीने शत्रत मिश्रा यांना उमेदवार केले.
महताब यांनी कटक जागेवर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बीजेडीच्या संतरूप मिश्रा यांचा ५७,०७७ मतांनी पराभव केला. तर ओडिशात लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा जिंकून भाजपने लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा सफाया केला. राज्यात काँग्रेसला एक जागा मिळाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडीने 12 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 8 आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती. यासोबतच ओडिशामध्येही भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच सरकार स्थापन केले.
याचे बक्षीस भर्तृहरी महताब यांना मिळाले आहे. त्यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले आहे. ते नवीन खासदारांना शपथ देतील. भर्तृहरी महताब हे लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून कर्तव्ये पार पाडतील. लोकसभा सदस्य के. सुरेश, टीआर बालू, राधामोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय हंगामी अध्यक्षांना मदत करतील.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासूनसुरू झाले आहे. यावेळी, कनिष्ठ सभागृहातील नवीन सदस्य शपथ घेतील आणि त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि नवीन सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामाची रूपरेषा सादर करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App