भारत २०२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार – राजीव चंद्रशेखर

chandrashekhar

 डिजिटल इंडिया कायदाही लवकरच आणणार असल्याचेही म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दृष्टिकोन ठेवला आहे की, भारत जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी पंतप्रधानांचा हवाला देत म्हटले की, भारत २०२६ पर्यंत ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास २४.५० लाख कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करेल. याचबरोबर आगामी वर्षापासून मोबाईल फोन निर्यातीचा, भारताच्या टॉप 10 श्रेणीत समावेश केला जाईल. India to manufacture USD 300 billion electronic goods by 2026: Rajeev Chandrasekhar

ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय चेन –

केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शनिवारी हेही सांगितले की, ग्लोबल इलेक्ट्रिक्स सप्लाय चेन संदर्भात पंतप्रधानांनी अतिशय स्पष्ट दृष्टीकोन ठेवला आहे. जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारत महत्त्वाचा खेळाडू असेल, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांना विश्वास आहे आणि त्यांनी लक्ष्य ठेवले आहे की, भारत २०२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन करेल.


चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने बनवले स्पेशल युनिट; कर्जाच्या पैशांचा असा होतोय वापर!


याशिवाय त्यांनी सांगितले की, पुढील वर्षीपासून मोबाईल निर्यात भारताच्या टॉप 10 श्रेणीत समाविष्ट होईल. एक अंतर्निहित दृष्टी आणि धोरणात्मक आराखडा आहे जो ग्लोबल ब्रॅंड्समध्ये हा बदल करत आहे आणि त्यांना भारताला एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहण्यासाठी प्रेरित करत आहे.

भारतात निर्माण होणार सर्वसमावेशक सेमीकंडक्टर इकोसिस्टम –

केंद्रीयमंत्री राजीव चंद्रेशखर यांनी हेही सांगितले की,पंतप्रधान मोदींजवळ इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टमला सर्वसमावेशक बनवण्याची दृष्टी आहे. लवकरच डिझाइन, पॅकेजिंग, फॅब्रिकेशन आणि मॅन्युफॅक्चरिंगसह एक सर्वसमावेशक सेमीकंडक्टर इकोसिस्टम भारतात निर्माण केली जाईल.

लवकरच आणणार डिजिटल इंडिया कायदा –

याशिवाय चंद्रशेखर यांनी म्हटले की, आम्ही आधुनिक कायद्यांचा आराखडा तयार करत आहोत आणि भारत नाविन्यपूर्णतेचे जागतिक केंद्र बनत आहे. आपल्याकडे स्टार्टअपसाठी सक्षम वातावरण आणि धोरणात्मक आराखडा आहे. आम्ही लवकरच डिजिटल इंडिया कायदा आणणार आहोत.

India to manufacture USD 300 billion electronic goods by 2026: Rajeev Chandrasekhar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”