वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शाळांना हुतात्मा जवानांची नावे देण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून या जवानांच्या कार्याचा गौरव होत असून त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना देशप्रेमाचे धडेही मिळण्यास मदत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांकडून मोठे स्वागत होत आहे. Government Higher Secondary Schools in Chandwan & Barwal in Kathua district have been renamed after Sepoy Bua Ditta Singh & Naik Yograj Singh respectively, who lost their lives in action
जम्मू काश्मीर सीमेवर देशसेवा करताना आणि दहशतवाद्यांशी लढताना अनेक जवानांनी प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण केले. प्रसंगी हौतात्म्य पत्करले. अशा वीरांचा यथोचित मरणोपरांत गौरवही केला जातो. पण, आता त्यांची नावे शाळांना देऊन सरकार त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रयत्न या माध्यमातून करत आहे.
जम्मू काश्मीरमधील काथुआ जिल्ह्यातील चंदवान आणि बरवाल येथील सरकारी उच्च माध्यमिक स्कुलचे नामकरण अनुक्रमे शिपाई बुआ दित्ता सिंग आणि नाईक योगीराज सिंग असे केले आहे. त्यांनी देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान दिले होते.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबाकडून स्वागत
हा एक चांगला उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रासाठी काहीतरी करण्यास प्रवृत्त करेल. – श्रद्धा, शिपाई बुआ दित्ता सिंग यांची नात
माझ्या नवऱ्याने राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाबद्दलची माहिती भावी पिढीला मिळेल. माझ्यासाठी, ते अजूनही जिवंत आहेत.
– नीलम कुमारी, नाईक योगराज सिंग यांची पत्नी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App