संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच ‘गंगूबाई फिव्हर’चा त्रास होत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर अनेक रील्स तयार होत आहेत.सोशल मीडियावर चाहते आपापल्या पद्धतीने आलियाची कॉपी करत आहेत. यादरम्यान आलियाच्या एका छोट्या चाहतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती गंगूबाईच्या पात्राची नक्कल करताना दिसत आहे. यावरून आता कंगना रनौतने (Kangana Ranaut) यावर निशाणा साधला आहे. GANGUBAI CONTROVERSY: little girls video goes viral along with Gangubai Kathiawadi’s dialogue! Kangana complains directly to PM and Smriti Irani …
या मुलीने सेक्स वर्करप्रमाणे नक्कल करावी का, तोंडात बिडी टाकावी आणि अश्लील डायलॉगबाजी करावी का? फक्त तीची देहबोली पहा. ते तीच्या वयासाठी चांगले आहे का? येथे आणखी 100 मुले आहेत जी हे करत आहेत.” कंगनाने या स्टोरीवर स्मृती इराणी यांनाही टॅग केले आहे. आणखी एक मुलगी आहे जी आलियाच्या या डायलॉगमध्ये लिप सिंक करून खूप लोकप्रिय झाली आहे.
https://www.instagram.com/tv/CZ4LFGMAqq1/?utm_source=ig_web_button_share_sheet
कंगना रनौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या मुलीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘या मुलीने तोंडात बीडी घेऊन अश्लील संवाद बोलत सेक्स वर्करची नक्कल करावी का? बघा या मुलीची देहबोली? या वयात लैंगिकता दाखवणे योग्य आहे का? आणखी शेकडो मुले आहेत, जे अशीच कृती करत आहेट. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 60च्या दशकातील कामाठीपुरा येथील प्रसिद्ध सेक्स वर्कर गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे.’
सरकारने कठोर कारवाई करावी!
‘या सर्व पालकांवर सरकारने कठोर कारवाई करावी, जे अल्पवयीन मुलांकडून पैसे कमवण्यासाठी सेक्स वर्कर आणि दलाल यांच्या बायोपिकची जाहिरात करत आहेत. यासोबतच त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना टॅग करत यात हस्तक्षेप करावा’, असे लिहिले आहे. त्याचबरोबर कंगना रनौतने या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, जी तिने आता डिलीट केली आहे.
कंगना रनौतने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणवर अनेकदा निशाणा साधला आहे. दीपिकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘Gehraiyaan’ या चित्रपटाची खिल्ली उडवत कंगनाने लिहिले होते की, चित्रपटाच्या नावावर कचरा देऊ नका.
अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा हुसैन जैदी लिखीत ‘माफिया क्वीस ऑफ मुंबई’ पुस्तकावर आधारित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App