कोरोना संकटातही गेल्यावर्षीपेक्षा 10 टक्के जास्त एफडीआय; चीनवरच्या अविश्वासामुळे भारतच आता ‘इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन’


कोरोना संकटामुळे उद्योगधंद्यांवर मंदीचे वादळ घोंगावत आहे. नवी गुंतवणूक करताना उद्योगपती चारदा विचार करत आहेत. मात्र या जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताबद्दलची जगाची प्रतिमा उत्तम असल्याचा दाखला मिळाला आहे. चिनी कोरोना विषाणूमुळे चीनबद्दलची विश्वासार्हता जगात वेगाने घसरत आहे. त्याचवेळी खंबीर सरकार, ठाम नेतृत्त्व आणि उद्योगधंद्यांसाठी अनुकूल धोरणे यामुळे भारत हे आता जगाचे नवे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनत चालले आहे. म्हणूनच कोरोना संकटातही भारतात यंदा गेल्यावर्षीपेक्षा 10 टक्के जास्त थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. FDI in corona crisis also 10% higher than last year; India is now an ‘investment destination’ for the world due to mistrust in China


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली ः सन 2020-21 या आर्थिक वर्षात भारतामध्ये आजवरची सर्वाधिक म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. गेल्यावर्षीच्या म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक दहा टक्क्यांनी जास्त आहे. गेल्यावर्षी देशात 74.39 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या दहा परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे. गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षात सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक भारतात केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंडने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील थेट परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांनी पहिली पसंती भारताला दिली आहे.

सन 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनी भागभांडवलात झालेली थेट परदेशी गुंतवणूक 59.64 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती 19 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी परदेशी गुंतवणूकदारांमध्ये जगात सिंगापूर प्रथम क्रमांकावर सिंगापूर आहे. सिंगापूरमध्ये जगातल्या एकूण एफडीआयपैकी 29% टक्के गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत 23% तर तिसऱ्या क्रमांकावरील मॉरिशस येथे 9 टक्के एफडीआय झाली आहे.

 

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात झालेल्या एफडीआयपैकी 44% गुंतवणूक ही एकट्या आयटी क्षेत्रात झाली आहे. त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13 % आणि सेवा क्षेत्रात 8% परदेशी गुंतवणूक झाली आहे.

राज्यनिहाय पाहिल्यास आयटी क्षेत्रातील सर्वाधिक एफडीआय गुजरातमध्ये 78%, कर्नाटकात 9% तर दिल्लीत 5% झाली आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरातला सर्वात जास्त म्हणजे 37% आणि त्याखालोखाल महाराष्ट्राला 27% गुंतवणूक मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली. आयटी क्षेत्रासाठी परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती गुजरातला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे.

FDI in corona crisis also 10% higher than last year; India is now an ‘investment destination’ for the world due to mistrust in China

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात