सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त; व्हर्च्युअल सुनावणीत पेंटिंग, शस्त्रांचे दर्शन

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली – आज आपण चांगल्या आठवणी आणि सदिच्छांसह निवृत्त होत आहे, असे मत मावळते सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज मांडले. सरन्यायाधीश बोबडे यांनी आपल्या कार्यकाळात ऐतिहासिक अयोध्या खटल्यासह अनेक मुद्दे निकाली काढले. CJI Sharad Bobade retired from service

कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी कोविडच्या स्थितीवरील खटल्यावर त्यांनी सुनावणी केली. ते म्हणाले की, या शेवटच्या सुनावणीचा अनुभव संमिश्र आहे. आपण आनंदाने, सदिच्छाने आणि चांगल्या आठवणीने निवृत्त होत आहोत. न्यायालयातील एकाहून एक सरस युक्तिवाद, वकिलांचे उत्तम सादरीकरण, चांगले वर्तन याच्या आठवणी मनावर कोरल्या गेल्या आहेत.



२४ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे जन्मलेले सरन्यायाधीश बोबडे यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कायद्याची पदवी नागपूर विद्यापीठातून घेतली. १९७८ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र येथे त्यांचे नाव नोंदले गेले.

न्यायाधीश बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली. १९९८ रोजी त्यांना ज्येष्ठ वकिलाचा दर्जा दिला. २९ मार्च २००० रोजी त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते सह न्यायाधीश बनले. १६ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. १२ एप्रिल २०१३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

CJI Sharad Bobade retired from service


महत्वाच्या’ बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात