वकील उमेश पाल आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आज पाच जणांना अटक करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद याच्या अडचणी वाढत आहेत. त्याच्या चकिया येथील कार्यालयातून पोलिसांनी लाखो रुपयांची रोकड आणि ११ पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त केली आहेत. Cash 11 pistols and live cartridges Police found weapons in Atiq Ahmeds office
अतिक अहमदच्या चकिया कार्यालयाचा समोरील भाग बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आला होता आणि आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कार्यालयाची झडती घेण्यात आली, तेथून लाखो रुपयांची रोकड आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
तामिळनाडू : चर्च मधील फादर बेनेडिक्ट अँटो यास लैंगिक शोषणप्रकरणी अटक
उमेश पाल खून प्रकरणात नाव असलेला अतिक अहमद सध्या गुजरातमधील तुरुंगात बंद आहे तर दुसरीकडे याच खून प्रकरणात नाव असलेली अतिकची पत्नी शाइस्ता परवीन आणि तिची दोन मुले फरार आहेत. अलीकडेच, बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी माजी आमदार अश्रफच्या दोन साथीदारांना अटक केली, जो जिल्हा कारागृहात बंद असलेला अतिक अहमदचा भाऊ आहे.
Five pistols, five country-made guns, one magazine and a total of 112 pieces of ammunition recovered. Six mobile phones recovered. A total of Rs 2.25 Lakhs seized from all the five. On their input, Rs 72.37 Lakhs seized from the office of Atiq Ahmed: Prayagraj Police Commissioner pic.twitter.com/RW7sKIXTpv — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 21, 2023
Five pistols, five country-made guns, one magazine and a total of 112 pieces of ammunition recovered. Six mobile phones recovered. A total of Rs 2.25 Lakhs seized from all the five. On their input, Rs 72.37 Lakhs seized from the office of Atiq Ahmed: Prayagraj Police Commissioner pic.twitter.com/RW7sKIXTpv
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 21, 2023
उमेश पाल खून प्रकरणानी कारवाई –
वकील उमेश पाल आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आज पाच जणांना अटक करण्यात आली. नियाज अहमद, मोहम्मद सजर, कैश अहमद, राकेश कुमार आणि मोहम्मद अर्शद खान उर्फ अर्शद कटरा अशी या पाच जणांची नावे आहेत. अशी माहिती प्रयागराज पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी दिली आहे.
माफियांना जमीनदोस्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत केली होती. यानंतर पोलीस आणि प्रशासन कारवाई करताना दिसत आहे. अतिक अहमदच्या मुलाचा ड्रायव्हर अरबाज हा चकमकीत मारला गेला. यानंतर चकिया येथील अतिक अहमदचा निकटवर्तीय जफर अहमद याचे घर बुधवारी बुलडोझरने फोडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App