विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेली अडीच – तीन वर्षे मराठी माध्यमे त्यांच्या “सूत्रांच्या” हवाल्याने देत असतात. आता पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मराठी माध्यमांच्या “टार्गेटवर” आले आहेत!! Marathi media engaged in Congress style reporting of BJP ‘s so called factionalism
पंकजा मुंडे यांच्या असलेल्या आणि नसलेल्या नाराजीच्या बातम्या देऊन मराठी माध्यमे थकली. पण पंकजा मुंडे भाजपमध्येच आहेत आणि त्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून कामही करीत आहेत. मध्य प्रदेशातील त्यांच्या कामासंदर्भात मराठी माध्यमे बातम्या देत नाहीत, पण विधान परिषदेपासून कुठल्याही निवडणुकीत त्यांना न दिलेल्या तिकिटाच्या संदर्भ नसलेल्या बातम्या रंगवून देण्यात मराठी माध्यमे आघाडीवर असतात.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुका जशा जवळ आले आहेत, तसे मराठी माध्यमांनी पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना “टार्गेटवर” घेतले आहे. विनोद तावडे यांना भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात विशेष जबाबदारी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय कोअर टीमचे ते सदस्य आहेत. 2024 ची स्ट्रॅटेजी ठरवण्यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखती दरम्यान त्यांना प्रामुख्याने महाराष्ट्र भाजप मधले प्रश्न विचारले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्रात भाजपचा कंपू आहे का??, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून विनोद तावडे महाराष्ट्र भाजपची सूत्रे घेणार का??, वगैरे प्रश्न विनोद तावडे यांना विचारले. अर्थातच विनोद तावडे यांचे या प्रश्नांना थेट नकारार्थीच उत्तर होते.
विनोद तावडे यांची कामगिरी
विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर त्यांच्याकडे हरियाणाची जबाबदारी सोपवली होती. तेथे त्यांनी स्वप्रयत्नाने सरकार आणून दाखवले. त्यानंतर बिहारची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. तेथेही त्यांची कामगिरी चमकदार झाली आणि आता राष्ट्रीय पातळीवर 2024 च्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांना प्रश्न विचारून भाजपची केंद्रीय पातळीवरची स्ट्रॅटेजी उलगडणे शक्य झाले नाही, म्हणून मग त्यांना महाराष्ट्र पातळीवरचे प्रश्न विचारून महाराष्ट्र भाजपमध्ये कसे गट तट आहेत, याची काल्पनिक बातमी करण्यात आली.
काँग्रेस स्टाईलचे रिपोर्टिंग
मराठी माध्यमे भाजपच्या अंतर्गत असलेल्या हालचालींचे रिपोर्टिंग काँग्रेसच्या स्टाईलने करीत असतात. काँग्रेसमध्ये विविध गट तट असणे हे त्या पक्षाचे राजकीय कल्चर आहे. भाजपचे ते राजकीय कल्चर नाही. तरी देखील भाजपमधून काँग्रेसच्या स्टाईलने बातम्या काढण्याचा फोल प्रयत्न मराठी माध्यमे करीत असतात.
पुरींची कबुली आणि बातम्यांच्या पुड्या
या संदर्भात इंडिया टुडेचे प्रमुख अरुण पुरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे खंत बोलून दाखवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या बातम्या लीक होत नाहीत. त्यांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण आहेत??, हे समजत नाही. मंत्रिमंडळातल्या फेरबदलाची नावे समोर येत नाहीत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री माध्यमांना समजतही नाहीत, ही जाहीर कबुली अरुण पुरी यांनी दिली आहे. तरी देखील मराठी माध्यमे काँग्रेसच्या स्टाईलने भाजपच्या अंतर्गत बाबींचे रिपोर्टिंग करायला जातात. त्यांचे एकही प्रेडिक्शन खरे उतरत नाही. त्यामुळे मग पंकजा मुंडे आणि आता विनोद तावडे अशा नेत्यांना “टार्गेट” करून भाजप मधल्या गटाच्या बातम्यांच्या पुड्या सोडण्याचा धंदा मराठी माध्यमांना करावा लागतो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App