विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भाजपच्या प्रचंड विजयाचा बोलबाला सुरू असला तरी आम आदमी पार्टीच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी तिथून आली आहे, ती म्हणजे आम आदमी पार्टीला 14 % मते मिळाल्याने त्या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आम आदमी पार्टीला आता निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पक्षाची मान्यता देऊ शकतो. Aam admi party gets 14 % votes in gujrat, paved the way to become national party, but it’s a political loss of opposition parties
2002 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली आणि अवघ्या 20 वर्षांमध्ये पक्षाने राष्ट्रीय पातळीपर्यंत आपली मजल पोहोचवली आहे. हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमचे मोठे यश मानावे लागेल. पण त्याच वेळी गुजरात मध्ये प्रचंड मोठा पराभव झाल्याने निराश झालेल्या काँग्रेस सह बाकी सर्व विरोधकांच्या पराभवावर आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनल्याने फुंकर मारली गेली आहे? की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनल्याने काँग्रेस सह सर्व विरोधकांना एक मोठा स्पर्धक तयार झाला आहे.
भाजप आणि काँग्रेस हे दोन बडे राष्ट्रीय पक्ष आहेत. सर्व राज्यांमध्ये त्यांचा व्यापक विस्तार आहे. त्या तुलनेत बाकीच्या सर्व पक्षांना सर्व राज्यांमध्ये नगण्य स्थान आहे. पण भाजप आणि काँग्रेस वगळता आम आदमी पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ज्याची दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये सत्ता आहे.
गुजरात की जनता के वोट से आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बन रही है. शिक्षा और स्वास्थ्य की राजनीति पहली बार राष्ट्रीय राजनीति में पहचान बना रही है. इसके लिए पूरे देश को बधाई. — Manish Sisodia (@msisodia) December 8, 2022
गुजरात की जनता के वोट से आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बन रही है.
शिक्षा और स्वास्थ्य की राजनीति पहली बार राष्ट्रीय राजनीति में पहचान बना रही है.
इसके लिए पूरे देश को बधाई.
— Manish Sisodia (@msisodia) December 8, 2022
बाकीचे सर्व पक्ष त्यामध्ये, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, शिवसेना, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपापल्या प्रदेशांपुरतेच प्रभावी पण मर्यादित आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांची संघटना देश पातळीवर आहे, पण त्यांचे प्रभाव आता त्यांची पूर्वी प्रभावक्षेत्रे राहिलेल्या पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये देखील संपले आहेत.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय पक्ष बनणे ही खऱ्या अर्थाने विरोधकांसाठी त्यांच्या पोटात गोळा आणणारी स्थिती आहे. कारण आम आदमी पार्टी मतांचा जो काही वाटा घेईल, तो विरोधकांच्या मतांमधून घेईल हे गुजरातच्या निवडणुकीने सिद्ध केले आहे. आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये सत्ता हिसकावून घेतली, ती भाजपकडून नव्हे, तर काँग्रेस कडून. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मात केली ती भाजपवर, पण सुपडा साफ झाला काँग्रेसचा आणि डाव्या पक्षांचा. त्यामुळे एक प्रकारे आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय पक्ष बनण्याने देशात जी राजकीय चुरस निर्माण झाली आहे, ती चुरस भाजप बरोबर इतर पक्षांची राहण्यापेक्षा विरोधकांमध्येच आपापसात चुरस तीव्र झाली आहे. किंबहुना मतांच्या टक्केवारीची आकडेवारी नेमके तेच ठळकपणे सांगते.
गुजरात मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. एकूण मतांच्या टक्केवारीत भाजप 50 % वर पोहोचला आहे. पक्षाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे यश आहे. म्हणजेच 50 % वर भाजप आणि इतर सर्व पक्षांमध्ये उरलेल्या 50 टक्क्यांमध्ये विभागणी असे हे चित्र आहे. अर्थातच त्यामध्ये आम आदमी पार्टीने 14 % मते मिळवल्याने त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेवर मोहर उमटणार आहे, ही विरोधकांच्या पराभवावरची फुंकर नसून खऱ्या अर्थाने जखमेवर मीठ चोळल्याचे चिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App