rafale jet | फ्रान्सकडून भारतीय हवाईदलाला आणखी तीन राफेल विमानं मिळाली आहेत, त्यामुळं भारतीय हवाईदलाच्या शक्तीमध्ये आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 31 मार्च रोजी रात्री उशिरा ही तीन राफेल विमानं गुजरातमधील भारतीय हवाईदलाच्या जामनगर बेसवर पोहोचली. फ्रान्सहून निघालेली ही तीन राफेल विमानं थेट जामनगरमध्ये लँड झाली. यूएईच्या मदतीने या विमानांमध्ये एअर टू एअर रि-फ्युलिंग करण्यात आलं. त्यामुळं भारतीय हवाई दलात समावेश झालेल्या एकूण राफेल विमानंची संख्या ही आता 14 वर पोहोतलवी आहे. यापूर्वी तीन टप्प्यांमध्ये 11 राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. तसंच एप्रिल महिन्यात आणखी 7 विमानं या ताफ्यात दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 3 rafeal jets land in india, now total number is 14
हेही वाचा..
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App