पुन्हा एकदा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इंम्तियाज जलील ‘आमने-सामने’

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इंम्तियाज जलील या दोघांमध्ये नेहमीच शाब्दिक वाद सुरू असतात.कधी ते निवडणुकीत आमनेसामने उभे राहतात तर कधी मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर आमने सामने येतात. Once again, former Aurangabad MP Chandrakant Khaire and current MP Imtiaz Jalil face-to-face

आता परत ही जुगलबंदी जनतेने पाहिली आणि ऐकली आहे. तर त्याचे झाले असे की औरंगाबाद मध्ये लॉकडाउन लावण्यात आला मात्र अमंलबजावणीच्या आधीच तो रद्द देखील झाला त्यावर इंम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत विजयी जल्लोष केला. त्यावेळी ना मास्क ना सोशल डिस्टंसिंग सगळंच कसं वार्यावर. यावरून चंद्रकांत खैरे जाम संतापले आणि त्यांनी खासदार जलील यांच्यावर टिकेचे बाण सोडले. 

औरंगाबाद शहरातील कोरोनाला इंम्तियाज जलील जबाबदार आहेत. इंम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा अशी मागणी खैरेंनी केली .

याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत खैरे प्रत्येक मुद्द्यावर जाती, धर्म आणतात. मास्क न घातल्याने जर प्रत्येकाला अटक केली असती तर सगळे जेल भरले असते. तसेच खैरेंनी कायदेही जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. असा पलटवार जलील यांनी केला.

Once again, former Aurangabad MP Chandrakant Khaire and current MP Imtiaz Jalil face-to-face

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*