औरंगाबादचं नामांतर का होत नाही? मनसे आक्रमक ; शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या गाडीला घेराव ; खैरे यांची मात्र हाताची घडी तोंडावर बोट

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन आता मनसे (MNS) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.  यात आज मनसैनिकांनी औरंगाबादेत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे  यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीला घेराव घातला.Why Aurangabad is not renamed? MNS aggressive; Shiv Sena’s Chandrakant Khaire’s car surrounded; Khaire, however, folded his finger over his mouth

तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे या मागणीवर ठाम राहत चंद्रकांत खैरे यांच्या अनेक प्रश्नांची सरबत्ती लावली.

चंद्रकांत खैरे यांची गाडी क्रांती चौकातून जाणार असल्याचं कळल्यानंतर शेकडो मनसेसैनिक हातात झेंडे घेऊन क्रांती चौकात दाखल झाले.
मनसे सैनिकांनी खैरे यांची गाडी येताच त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली .त्यामुळे खैरे यांना गाडीच्या बाहेर यावं लागलं.  यावेळी खैरे यांनी मनसे सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
पण आक्रमक मनसे सैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी करत औरंगाबादचं नामांतर का होत नाही? असा जाब खैरे यांना विचारला.

मनसे औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे यावर मनसे ठाम आहेया संदर्भात मनसेने शिवसेनेला अल्टिमेटम देखील होता.
त्याचे पुढे काय याबाबत मनसैनिकांनी चंद्रकांत खैरे यांना जाब विचारला . हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे . मात्र यावर खैरेंनी मौन बाळगणे पसंद केले .

Why Aurangabad is not renamed? MNS aggressive; Shiv Sena’s Chandrakant Khaire’s car surrounded; Khaire, however, folded his finger over his mouth

मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली.  यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि
‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या.
त्यामुळे नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खैरेंना गप्प उभं राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. खैरे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प उभे होते .

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*