
स्मरणप्रक्रियेमध्ये जेव्हा माहिती मिळवली जाते तेव्हा मुख्यत्वेकरून तीन घडामोडी होतात. प्रथम माहिती मिळवण्याचा टप्पा. या टप्प्यात मिळालेल्या माहितीची प्रथम नोंदणी केली जाते. त्यानंतर नोंदणी केलेली माहिती संग्रहित केली जाते; साठवली जाते. संग्रहित माहिती जरूर पडेल तेव्हां परत मिळवली जाते. स्मरणशक्तीचे तीन प्रकार वर्णिले आहेत.why there are three types of memory
संवेदनात्मक ज्ञानाद्वारे प्राप्त होणारी स्मरणशक्ती, अल्प मुदतीची स्मरणशक्ती, दीर्घ मुदतीची स्मरणशक्ती. संवेदनात्मक ज्ञानाद्वारे प्राप्त होणारी स्मरणशक्ती म्हणजेच सेन्सरी मेमरी. हे स्मरण अत्यंत अल्पजीवी असते. या प्रकारात माहिती मिळाल्यानंतर ती माहिती जेमतेम एक सेकंद ताब्यात ठेवली जाते.मेंदूद्वारे होणारी ही एक स्वयंचलित क्रिया असते.
याचा आखो-देखा-हाल व्यक्त करताना प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती म्हणते, मी कथन केलेल्या माहितीपेक्षा मला थोडे अधिक दिसले.पण ते वृत्तांतात येऊ शकले नाही. यावरून त्या स्मरणप्रक्रियेचे आयुर्मान किती अल्प असते याची कल्पना येते. कारण वृत्तांत देता देता ही अल्पजीवी प्रक्रिया मेंदूतून निसटलेली असते. या सर्व साधारण स्थितीत कोणतेही वैगुण्य नसते. शास्त्रज्ञ जॉर्ज स्परलिंग यांनी यावर सखोल संशोधन केले.
अनेक अथक प्रयोगानंतर या निर्णयाप्रत आला असला तरी, माझ्या प्रयोगाची हि एक अपूर्ण रुपाली आहे असे ते विनयाने म्हणतात. स्परलिंगने असे निदर्शनास आणून दिले कि या प्रकारात स्मरणशक्तीची धारणाशक्ती अंदाजे १२ कलमी असते. परंतु ती १०० मिलिसेकंदमध्ये नष्ट होते. तालीम किंवा रियाज करून तिची व्याप्ती वाढवता येत नाही. यामुळे बघणाऱ्याला १२ वस्तू दिसल्या तरी त्यांचा वृत्तांतात समाविष्ट होण्यापूर्वी काही वस्तू स्मृतिपटलावरून गायब झालेल्या असतात.
अशा अल्पजीवी स्मरणशक्तीमध्ये दृश्यरूपात दिसलेल्या, कानांनी ऐकलेल्या किंवा स्पर्शज्ञानाने जाणलेल्या गोष्टीचे उगमस्थान कोणतेही असो, त्या सर्व अल्पजीवीच असतात. स्परलिंग याला अपूर्ण वृत्तांताची रुपावली असे म्हणतो.