The Focus India Navratri 2021 : अहं सर्वेश्वरी अहं शक्ती!दुसरी माळ आसामच्या ‘आयर्न लेडी’ला ! AK-47 चा टेरर – एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजुक्ता पराशर


  • शौर्याचं दुसरं नाव म्हणजे संजुक्ता पराशर. संजुक्ता या आसामच्या आयपीएस अधिकारी असून त्यांचं नाव ऐकल्यावर दहशतवादीसुद्ध थरथर कापतात.
  • त्यांनी १५ महिन्यांत १६ दहशतवाद्यांचं एन्काऊंटर, ६४ हून अधिक जणांना अटक आणि अनेक टन दारुगोळा आणि शस्त्रे जप्त केली आहेत. आसाममधील अतिरेक्यांच्या मनात धडकी भरण्यासाठी त्यांचं नावंच पुरेसं आहे.
  • हिंमत, वीरता आणि साहसाचे प्रतिक संजुक्ता या सुरक्षा दलाच्या स्टार ऑफिसर असल्या तरी दहशतवाद्यांसाठी त्या कर्दनकाळ आहेत.
  • संजुक्ता या आसामच्या दुर्गम जंगलांमध्ये एके-४७ बंदूक घेऊन आपल्या टीमसोबत गस्त घालत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ओळखल्या जातात.

Navratri 2021 Navdurga Mahatmya Devi Brahmacharini worshiped on Second Day Of Navratri, Know Historical Story

औरंगाबाद: आसाममध्ये संजुक्ता पराशर या महिला अधिकाऱ्याचे नाव खूप लोकप्रिय आहे. संजुक्ता या आसाममध्ये आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या धाडसाने आणि शौर्याने तिथल्या गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले आहे. Aham Sarveshwari Aham Shakti! Meet ‘Iron Lady’ of Assam! Terror of AK-47 – Encounter Specialist Sanjukta Parashar

केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी १६ दहशतवाद्यांना ठार केलं, तर ६४ पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरूंगात रवानगी केली.

हातात AK-47 घेऊन त्या स्वत: जंगलात घुसून दहशतवाद्यांवर वचक बसवतात. आज भेटूयात या आयर्न लेडी संजुक्ता पराशर यांना …

संजुक्ता यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने २०१४ मध्ये १७५ तर २०१३ मध्ये १७२ दहशतवाद्यांना अटक केलीय.

संजुक्ता पराशर यांनी अखिल भारतीय नागरी सेवा परीक्षेत ८५वा क्रमांक मिळवला होता आणि २००६ बॅचमधील त्या आयपीएस अधिकारी आहेत. यानंतर त्यांनी मेघालय-आसाम कॅडर निवडला.

२००८ मध्ये त्यांच्या पहिल्या पोस्टिंगदरम्यान, संजुक्ता यांची आसाममधल्या माकुल याठिकाणी सहाय्यक कमांडंड म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांना उदलगिरीमध्ये बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पाठवण्यात आलं.

आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एसपी असताना संजुक्ता यांनी सीआरपीएफ जवानांच्या टीमचे नेतृत्व केले होते. एके ४७ हाताळत त्यांनी स्वत: बोडो अतिरेक्यांशी लढा दिला.

या ऑपरेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये त्या संपूर्ण टीमसोबत एके ४७ रायफल घेऊन जाताना दिसत होत्या.

२०१५ साली संजुक्ता यांनी बोडोविरोधी दहशतवादी कारवाईचे नेतृत्व केले होते. त्यांनी केवळ १५ महिन्यांत १६ अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.

संजुक्ता या सोशल नेटवर्किंगवरुन वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.

संजुक्ता या आसाममधील सोनितपूरच्या पोलीस अधीक्षक असताना त्यांनी एका मोहिमेमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

संजुक्ता या ४१ वर्षांच्या असूनही अगदी फीट आहेत. त्या रोज मॉर्निंग वॉकला वगैरे तर जातातच शिवाय आपल्या सहकऱ्यांनाही त्या ठणठणीत राहण्याचं महत्व पटवून देतात.

काय आहे कहाणी?

संजूक्ता पराशरचा जन्म ३ ऑक्टोबर १९७९ रोजी आसाममध्ये झाला. त्यांचे वडिल दुलाल चंद्र बरुआ हे सिंचन विभागात अभियंता म्हणून काम करतात आणि आई मीना देवी या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. संजूक्ता यांनी आसाममधील गुवाहाटी आर्मी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत असल्यापासून त्यांना खेळात विशेष आवड होती. त्या शाळेत प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्यात जिंकण्यासाठी मेहनत घेत. त्यांना पोहण्याची खूप आवड होती. शालेय शिक्षणानंतर त्या दिल्लीत आल्या.

त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जेएनयूमधून इंटरनॅशन रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये MPhil आणि Ph D केलं. जेएनयूमधून शिक्षण पूर्ण करतानाच त्या युपीएससीचीदेखील तयारी करत होत्या. २००६ मध्ये त्या युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, त्या परीक्षेत त्यांचा ८५ वा क्रमांक आला. त्यांना एखादा डेस्क जॉब पण करता येणे शक्य होते, पण त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांची आसाम मेघालय कॅडरसाठी निवड झाली.

संजुक्ता यांना २००८ मध्ये आसामच्या माकुम जिल्ह्यात असिस्टंट कमाडंट म्हणून पहिली फिल्ड पोस्टींग मिळाली.
त्यांना उदलगिरीमध्ये बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात आले. संजुक्ता पराशर यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. तिथेच त्यांनी केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत १६ दहशतवाद्यांना ठार केलं, तर ६४ पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरूंगात रवानगी केली. हा एक रेकॉर्डच आहे. हाती एके ४७ घेऊन त्या स्वत: जंगलात कोंबिंग ऑपरेशन केले. इतक्या बेधडक कारवाईने त्यांचे सगळीकडे कौतुक झाले. एखाद्या महिला अधिकाऱ्याने दहशतवाद्यांच्या मनात खरोखर धडकी भरवली होती. त्यांना अनेक धमकीचे फोन आले, प्रसंगी घाबरवण्यात आले, पण त्या कोणालाच घाबरल्या नाहीत. देशसेवा आणि निडरपणा त्यांच्या रक्तातच आहे.

वैयक्तिक जीवनात त्या खूप प्रेमळ आहेत. त्या म्हणतात मला गुन्हेगार आणि दहशदवादी यांच्याशिवाय कोणीही घाबरु नये. त्यांचे लग्न आयएएस अधिकारी पुरू गुप्ता यांच्याशी झाले आहे. त्यांना एक लहान मुलगादेखील आहे. बऱ्याचदा दोन महिन्यांतून फक्त एकदाच त्यांना आपल्याला कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. एक आई म्हणून त्यांना याची खंत ही वाटते. पण देशसेवा हाच धर्म मानलेल्या संजूक्ता यांना कर्तव्यही तितकेच महत्वाचे आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात त्या धीराने सामोरे जातात. सध्या त्या नॅशनल इंटलिजस एजंसी (NIA) नवी दिल्लीत पुलिस उपमहानिरीक्षक म्हणजे डीआयजी म्हणून कार्यरत आहेत.

आजही ज्यांचं नाव एकूण गुन्हेगार आणि दहतवाद्यांचाही थरकाप उडतो अशा धाडसी पोलीस अधिकारी संजुक्ता पराशर यांना एक कडक सॅल्युट तर झालाच पाहिजे.

Aham Sarveshwari Aham Shakti! Meet ‘Iron Lady’ of Assam! Terror of AK-47 – Encounter Specialist Sanjukta Parashar

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”