मूळात जबरदस्तीने आणि आमिषाने होणारे धर्मांतर रोखलेच पाहिजे, लग्नासाठी धर्मांतर पाहिजेच कशाला?, राजनाथ सिंहांचा परखड सवाल


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धर्मांतर विरोधी कायद्याचे समर्थन केले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – मूळात जबरदस्तीने आणि आमिषाने होणारे धर्मांतर रोखलेच पाहिजे, लग्नासाठी धर्मांतर पाहिजेच कशाला?, असा परखड सवाल करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धर्मांतर विरोधी कायद्याचे समर्थन केले.राजनाथ सिंह म्हणाले की, मी वैयक्तिकरित्या लग्नासाठी धर्मांतराचे समर्थन करत नाही. ते म्हणाले, ‘ मी विचारू ईच्छितो की लग्नासाठी धर्मांतर कशाला? सामूहिक पातळीवरील धर्मांतर थांबले पाहिजे. माझ्या माहितीनुसार मुस्लिम व्यक्तीला कोणत्याही इतर धर्मात लग्न करण्याची परवानगीच नाही. मी वैयक्तिकरित्या लग्नासाठी धर्मांतर मान्यच नाही. why conversion for marriage, Rajnath Singh question

राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारमार्फत केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्याच्या दुरूपयोगा संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी परखड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की नैसर्गिक विवाह आणि लग्नासाठी जबरदस्ती धर्मांतर यात फार मोठा फरक आहे. ‘बर्‍याच प्रकरणांमध्ये बळजबरीने धर्मांतर केले गेले आहे आणि अनेक वेळा पैशांसाठी देखील धर्मांतर केले गेले आहे. उत्तर प्रदेश सरकार बनवित असलेल्या कायद्यात या सर्व गोष्टींवर विचार करण्यात आला आहे.

why conversion for marriage, Rajnath Singh question

माझ्या मते एक खरा हिंदू कधीच जातीच्या आधारे भेदभाव करणार नाही. आमचे धार्मिक ग्रंथ देखील याला परवानगी देत नाही. भारत असा एकमेव देश आहे , जो वसुधैव कुटुंबकमचा संदेश देतो. कोणत्याही देशात तसे नाही, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण