कॉंग्रेसचे ‘हे’ माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी गोमांस खाणार, तुम्ही कोण अडवणारे?


कॉंग्रेसचा दुट्टपीपट्टा उघड करणारी घटना बुधवारी कर्नाटकच्या विधिमंडळात घडली. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी गोवंश संवर्धन, गोमाता पुजनाचे कार्यक्रम घेत आहेत. तिकडे कर्नाटकात मात्र कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते मी गोमांस खाणार, तुम्ही कोण मला अडवणारे, अशी भाषा करत गोवंश संवर्धनाला विरोध करत आहेत. यामुळे कॉंग्रेसचे नेमके धोरण काय असा प्रश्न झाला आहे. केवळ लोकांना भुलवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात हा पक्ष दुटप्पीपणा करणार का, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. कर्नाटकातील भाजपा सरकारने गोहत्या बंदी विधेयक मांडल्यामुळे सिद्धरामय्या यांना संताप अनावर झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले की, कोणी काय खावे हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. मला बीफ खायचे तर मी खाणार. मला कोणीही अडवू शकत नाही. मला प्रश्न करणारे तुम्ही कोण तुम्ही खात नसाल तर सोडून द्या, मी तुम्हाला बळजोरी करणार नाही.

कॉंग्रेसच्या 135 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. सिद्धरामय्या म्हणाले की, आपले कार्यकर्ते याबद्दल बोलताना घाबरतात. परंतु, याबाबतीत मनात व्दिधा अवस्था नको. गोमांसाच्याबाबतीत आपण स्पष्ट भूमिका घ्यायला हवी.

सिद्धरामय्या म्हणाले, “इतर लोक बोलतात ते बरोबर आहे असे समजून आपण गप्प बसता कामा नये. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ठामपणे गोमांस भक्षणाचे समर्थन केले पाहिजे.” कर्नाटक मुख्यमंत्री भाजपा नेते येडियुरप्पा यांनी गोवंश हत्याबंदी विधेयक आणल्यामुळे कर्नाटकातील बहुसंख्य लोकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र काही मुस्लिम संघटनांनी याचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

येडियुरप्पा सरकारने गोवंश हत्याबंदी विधेयक मंत्रीमंडळासमोर आणले आहे. लवकरच ते विधिमंडळात चर्चेस ठेवले जाणार आहे. विधिमंडळातील भाजपाचे बहुमत पाहता ते मंजूर होण्यात अडचणी नाहीत. एकदा का या विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले की, कर्नाटकातील गोवंश हत्येला अटकाव बसेल. म्हशी आणि रेड्यांची कत्तर मात्र पूर्ववत चालू राहिल.

The former Congress chief minister said, “I will eat beef. Who will stop you

सिद्धरामय्या यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आदेश दिला की, महात्मा गाधी आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या विद्वान लोकांनी ज्या हिंदुत्त्वाचे पालन केले त्या हिंदुत्त्वावर कॉंग्रेसचा विश्वास आहे, याचा प्रसार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. सिद्धरामय्या म्हणाले, “या नेत्यांनी राजकीय हित जपण्यासाठी धर्माचा वापर कधीच केला नाही. परंतु, भाजपा आणि संघ परिवार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करते. कॉंग्रेसने हे बिंग फोडले पाहिजे.” भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या सिद्धरामय्या यांना उत्तर प्रदेशात कॉंग्रेस काय करते, प्रियंका गांधी यांनी गोमाता पुजनाचे कार्यक्रम का चालवले आहेत, हे दिसत नाही का, असा प्रश्न कर्नाटकात विचारला जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात