अखिलेश यांचं चाललंय काय?; प्रियांका – मायावतींच्या साथी शिवाय खरं नाय…!!

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत असताना राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना निकालाचा अंदाज आलेला दिसतो आहे. त्यामुळे ते एकमेकांविरोधात प्रचार जरी हिरीरीने करत असले तरी राजकीय दृष्ट्या सूचक पद्धतीने एकमेकांच्या साथी शिवाय आपले काही खरे नाही, हे मान्य करून राजकीय हालचाली करताना दिसत आहेत.What’s going on with Akhilesh ?; Priyanka – Mayawati’s companion is not a real hero

याचे प्रत्यंतर बुलंदशहर मतदारसंघात आले आहे. बुलंदशहर मध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव – जयंत चौधरी यांच्या आघाडीचा समाजवादी रथ आणि काँग्रेसचे नेते प्रियांका गांधी यांची जनसंपर्क यात्रा एकमेकांच्या समोर आली. त्यावेळी अर्थातच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण त्याचवेळी अखिलेश यादव आणि जयंत चौधरी या दोघांनी रथावरूनच प्रियांका गांधी यांना अभिवादन केले. उत्तर प्रदेशची “तहजीब” असे सांगत अखिलेश यादव यांनी “सलाम दुवा” असे ट्विट देखील केले.



त्यालाच “तुम्हालाही आमचा रामराम”, असा प्रतिसाद प्रियांका गांधी यांनी दिला. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळामध्ये अखिलेश – प्रियांका राजकीय केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली. अखिलेश यांचे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाले आहे. अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांचे राजकीय केमिस्ट्री अशा पद्धतीने जमत असताना स्वरा भास्कर, सुप्रिया श्रीनेत आदी लिबरलनी या लोकशाहीवादी संस्कृतीचे स्वागत केले आहे. अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी कोणत्या का होईना निमित्ताने एकत्र येत आहेत याचे लिबरल जगतात स्वागत झाले आहे.

एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे बुलंदशहर मधूनच अखिलेश यादव यांनी मायावती यांचे नाव न घेता आंबेडकरवाद्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले आहे. आमचा लाल रंग आहे. पिवळा, हिरवा हे रंग आमच्याबरोबर आहेत. निळ्या रंगाने ही आम्हास साथ द्यावी. कारण आपण बहुरंगी लोक आहोत. देशातली लोकशाही वाचवण्यासाठी समाजवाद्यांना आंबेडकरवाद्यांनी साथ दिली पाहिजे, असे आवाहन अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. मायावतींना मदतीसाठी साद घालण्याचाच प्रकार आहे.

याचा राजकीय अर्थ उघड आहे. उत्तर प्रदेशात प्रचंड शक्तिशाली झालेल्या भाजपशी टक्कर घेताना समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष यांनी कितीही आव आणला तरी, त्यांची पुरती दमछाक होताना दिसत आहे. आणि आपण स्वतंत्रपणे लढलो तरी भाजपशी खऱ्या अर्थाने निर्णायक टक्कर घेऊ शकत नाही, याची पुरती जाणीव या पक्षाच्या नेत्यांना झालेले दिसत आहे. त्यातूनच मतदानाचा पहिला टप्पा पार पडण्यापूर्वीच राजकीय वास्तव लक्षात घेत अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांची राजकीय हालचाल केल्याचे दिसत आहे आणि त्यापुढे जाऊन अखिलेश यादव यांनी भले मायावतींचे नाव घेतले नसेल, पण आंबेडकरवाद्यांना मदतीसाठी साद घातली आहे…!!

मतदानाचा पहिला टप्पा पार पडण्यापूर्वी ची ही राजकीय अवस्था आहे. मतदानाचे पाच टप्पे पार पाडायचे आहेत. गंगा यमुना, गोमतीतून बरेच “राजकीय पाणी” वाहून जायचे आहे. अशा वेळी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष हे भाजपला कितपत पुरे पडू शकतील आणि त्याच्यावर किती मात करू शकतील?, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण या पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारातील भाषण पलिकडे जाऊन पाहिले तर या सर्व पक्षांना भाजप विरोधात स्वतंत्रपणे यश मिळणे दुरापास्त आहेच, पण एकत्र आले तरी त्यांच्या यशाचे प्रमाण किती राहते याविषयी मोठ्या प्रमाणावर शंका आहे…!!

What’s going on with Akhilesh ?; Priyanka – Mayawati’s companion is not a real hero

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात