गंगुबाई काठियावाडीच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद; 2 तासांत 15 लाख व्ह्यूज!!; 25 फेब्रुवारीला प्रदर्शित


प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड मिलियनहून अधिक प्रेक्षकांनी तो पाहिला आहे. ट्रेलरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.Storm response to Gangubai Kathiawadi trailer; 15 lakh views in 2 hours !!; Displayed February 25

काहींना आलियाचा लुक आवडला तर काहींनी तिच्या अभिनयाची तारिफ केली आहे. आधी हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.आलिया भट्टच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगण या चित्रपटात गँगस्टर करीमलालाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलियाचा बोल्ड लुक दिसतो आहे. शिवाय या दमदार संवादही आहेत.

Storm response to Gangubai Kathiawadi trailer; 15 lakh views in 2 hours !!; Displayed February 25

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय