पश्चिम बंगालमध्ये कोरोना कहर ; निवडणूकांच्या गडबडीत वाढला मृत्यूदर

  • पश्चिम बंगालमध्ये आरोग्याच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्यात लाखोंच्या सभेचा अट्टाहास सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत.
  • गर्दीसह वाढतोय कोरोना
  • महाराष्ट्राच्या बरोबरीने मृत्यूदर          

विशेष प्रतिनिधी 

कोलकाता : देशभरात करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना  देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक जोरदार प्रचार करत आहेत . या राज्यांमध्ये करोना रुग्णवाढीकडे आणि करोना नियम पाळण्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. आता त्याचे परिणाम समोर येत असून पश्चिम बंगालमध्ये करोना मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.West bengal Corona : increased death rate due to elections !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस तसेच इतर डावे पक्ष प्रचारासाठी सभा घेत असून रॅली काढत आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभांमध्ये करोना नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. या कालावधीत बंगालमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

सोमवारी राज्यात 4511 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या एका दिवसात नोंदवली गेलेली राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मृत्यूदर 1.7 झाला आहे. हा दर महाराष्ट्राइतका आहे.

मागील सात दिवसांपासून बंगालमध्ये दररोज 3,040 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. बिहारमध्ये हा आकडा 2,122 तर झारखंडमध्ये 1,734 आणि ओडिसामध्ये 981 आहे. तर आसाममध्ये नव्या रुग्णांची संख्या 234 इतकी आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीतही बंगाल देशात सातव्या क्रमांकावर आहे.

बिहार, झारखंड, आसाम आणि ओडिशा या शेजारच्या राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये केसेसमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. इथे फ़क़्त चवथ्या टप्प्यातील मतदान होत असून, पुढे राज्यात प्रचार फिव्हर आणि करोना कहर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

West bengal Corona : increased death rate due to elections !

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात