वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी : पहा मराठी अभिनेत्रींचा ‘गुढीपाडवा’


  • गुढीपाडवा हा आनंदाचा सण… याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
  • वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करत आहेत.
  • तुमच्यासाठी खास मराठी कलाकारांचा पाडवा.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा दिवस. मराठमोळ्या वर्षाचा पहिला वहिला सण. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात पार पडतो. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर गुढी उभारल्याचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. Gudi Padwa special wishes from Marathi celebrities

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या आईसोबत गुढीची पूजा करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CNmBBThH4Hx/?utm_source=ig_web_button_share_sheet

या व्हिडीओत ती सुंदर अशा पारंपारिक वेशात दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना घरीच रहा, सुरक्षित रहा असा संदेश देत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CNl–ocpFuz/?utm_source=ig_web_button_share_sheet

तर अभिनेत्री रिंकू राजगुरू शूटिंगमुळे घराबाहेर आहे. आर््ची साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. सोबतच तिने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, सर्वांना गुढी पाडवा आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निळ्या रंगाच्या साडीत गुढीसोबतचे फोटो शेअर करत घरचा पाडवा, गुढी पाडवा असे म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CNmEXe2rm-_/?utm_source=ig_web_button_share_sheet

अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा. हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा.

https://www.instagram.com/p/CNmCZ70DKgP/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

Gudi Padwa special wishes from Marathi celebrities

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण