विशेष प्रतिनिधी
मुंबई : संपुर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरदार सुरु आहे. मात्र उठसुट मोदी सरकारवर टीका करणार्यांनी कायमच महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे चित्र रंगवले .वस्तुस्थिति तर हेच सांगते की महाराष्ट्राला अव्वल लस पुरवठा करण्यात आला आणि त्यामूळेच महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत प्रथम क्रमांकावर आहे .WATCH: Maharashtra leads in corona vaccination! The number of people taking both doses is over 50 lakhs
या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेत देशात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात सध्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. तर राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून — Rajesh Tope (@rajeshtope11) June 10, 2021
राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 10, 2021
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची माहिती ट्विट केली आहे. “राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल यंत्रणेचे अभिनंदन”!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App