‘अत्यावश्यक औषधा’च्या नावाखाली गांजाची तस्करी, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनसीबीची कारवाई


वृत्तसंस्था

मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली सेंद्रिय गांजाची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे. Cannabis smuggling under the guise of ‘essential medicine’, Assets worth Rs 1 crore seized; NCB action

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पर्दाफाश केला आहे. एनसीबीने बेलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई केली. एक कोटी रुपये किंमतीचा सेंद्रिय गांजा जप्त केला आहे.

बॅलार्ड पियरच्या फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयात एक पार्सल आले होते. त्या पार्सलमधून वास येत असल्याने तेथील कर्मचाऱ्याने त्याची माहिती एनसीबीला दिली. त्यानंतर एनसीबीचे पथक घटनास्थळी गेले. अधिकाऱ्याने पार्सल उघडून पाहिले असता त्यात सेंद्रिय गांजा होता. त्या पार्सलच्या वर ‘अत्यावश्यक औषधे’ असे लिहिले होते.



एनसीबीने कारवाई करून 2 किलो गांजा जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे, हा सेंद्रिय गांजा 5 ते 8 हजार रुपये प्रति ग्रॅम विकला जातो. या प्रकरणी एनसीबीने अज्ञात व्यक्तीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Cannabis smuggling under the guise of ‘essential medicine’, Assets worth Rs 1 crore seized; NCB action

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात