तिरुमालातील अंजनेद्रीचा डोंगर हनुमानाचे जन्मस्थान, राम नवमीदिवशीच तिरुपती देवस्थानची घोषणा


विशेष प्रतिनिधी

तिरुपती : येथील अंजनेद्री हा डोंगर भगवान हनुमानाचे जन्मस्थान असल्याची अधिकृत घोषणा तिरुमला तिरुपती देवस्थानने आज केली. मुख्य मंदिरापासून उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे.Lord Hanuman born at anjanedri

येथील अंजनेद्री हा डोंगरच भगवान हनुमानाचे जन्मस्थान असून दक्षिण भारतामध्ये या देवतेची ओळख अंजनेय स्वामी अशी आहे, असे देवस्थान समितीने म्हटले आहे. देवस्थान समितीने या संदर्भात एक पुस्तिका देखील प्रसिद्ध केलीअसून त्यामध्ये काही पौराणिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक पुरावे देखील मांडण्यात आले आहेत. तिरुमलाच्या सात डोंगरांमध्ये अंजनेद्रीचा देखील समावेश होतो.

या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी देवस्थान समितीने राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मुरलीधर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रांतील अभ्यासकांची एक समिती स्थापन केली होती.

समितीने प्राचीन साहित्य, लिपींचा अभ्यास केला तसेच काही ज्योतिषशास्त्रीय गणनांचा आधार घेत हा निष्कर्ष काढला आहे. कर्नाटकातील काही अभ्यासकांनी तिरुपती देवस्थानच्या या दाव्याला आक्षेप घेतला होता.

Lord Hanuman born at anjanedri

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर