कर्नाटकात भाजपच्या बंडखोर आमदारांना केंद्रीय नेतृत्वाचा इशारा; पक्षविरोधी कारवायांचे रेकॉर्ड ठेवले जातेय


वृत्तसंस्था

बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये बंडखोर आमदारांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या पक्ष विरोधी कारवायांचे रेकॉर्ड ठेवले जातेय, असा इशारा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे. want to clarify that there’re 2-3 MLAs who are acting in a way that’s harming party’s image. State BJP chief

भाजपचे सरचिटणीस आणि कर्नाटकाचे प्रभारी अरूण सिंग सध्या राज्यात आहेत. ते मंत्र्यांशी आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. ते म्हणाले,की कर्नाटकात नेतृत्वाविषयी आपण कोणत्याही आमदाराशी चर्चा केलेली नाही. भाजपमधले दोन – तीन आमदार असे आहेत, की ज्यांच्या वक्तव्यांमधून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचते आहे.

त्यांचे रेकॉर्ड ठेवले जात आहे. त्यांना आवाहन आहे, की त्यांनी आपल्या वक्तव्यातून पक्षाच्या प्रतिमेला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. आमदार विश्वनाथ हे भाजपमध्ये नवीन आहेत. त्यांना भाजपच्या राजकीय संस्कृतीची फारशी माहिती नाही. त्यांना ती समजावून सांगण्यात येईल, असा इशारा देखील अरूण सिंग यांनी दिला.

कर्नाटकात येडियुरप्पांच्या नेतृत्वबदलाच्या प्रश्नावर अरूण सिंग यांनी कालच पडदा टाकला होता. त्यामुळे नेतृत्वाविषयी राज्यातल्या नेत्यांशी त्यांची चर्चा झाली नाही. उलट राज्यातल्या बंडखोरांनाच त्यांनी आपल्या वक्तव्यातून पक्षशिस्तीचे पालन करण्याचा इशारा दिला.

want to clarify that there’re 2-3 MLAs who are acting in a way that’s harming party’s image. State BJP chief

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात