तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा थेट सवाल शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. नितीन राऊत आणि अशोक चव्हाण हे मंत्री मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Vinayak Mete Direct question of against whether Congress is on the side of Maratha community
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा थेट सवाल शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. नितीन राऊत आणि अशोक चव्हाण हे मंत्री मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Vinayak Mete Direct question of against whether Congress is on the side of Maratha community
मेटे यांनी यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मराठा समाज नितीन राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल या पत्रात उपस्थित केला आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता.
त्यामुळे सध्या मराठा आंदोलक महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून कशाप्रकारे युक्तिवाद केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाची मराठी आरक्षण उपसमिती सातत्याने वकीलांच्या संपर्कात आहे. आगामी सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याला राज्य सरकारचे प्राधान्य असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App