काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीने सरकार पुन्हा पडले तोंडावर, वडेट्टवारांनी लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत घातला गोंधळ, मुख्यमंत्री कार्यालयाने बदलला निर्णय


काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीमुळे सरकार पुन्हा तोंडावर पडले आहे. लॉकडाऊन उठविण्याबाबतच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील तिघाडी पुन्हा समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांनी गोंधळ घालत राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगून वडेट्टीवारांना चांगलेच तोंडावर पाडले. Vijay Vadettawar made a fuss about the lockdown decision, the decision was changed by the Chief Minister’s Office


प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस मंत्र्यांच्या चमकोगिरीमुळे सरकार पुन्हा तोंडावर पडले आहे. लॉकडाऊन उठविण्याबाबतच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील तिघाडी पुन्हा समोर आली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांनी गोंधळ घालत राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगून वडेट्टीवारांना चांगलेच तोंडावर पाडले.

राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु त्यानंतर राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असे अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात आलं.



कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत.

राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असे शासनानं स्पष्ट केलं आहे. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णया द्वारे स्पष्ट करण्यात येईल, असेही शासनातर्फे सांगण्यात आले आहे.

कॉँग्रेसच्या मंत्र्यांच्या चमकोगिरीमुळे सरकार तोंडावर पडत असल्याचे सातत्याने घडत आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारमधील गोंधळ समोर आला होता. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याची नितीन राऊत यांनी प्रेस नोटद्वारे माहिती देऊन सांगितले होते.

मात्र, याबाबतचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिली होती. नितीन राऊत यांनी याबाबतची प्रेस नोट जारी केल्याने अजित पवारांनी नाराज व्यक्त केली होती. आजही आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी परस्पर निर्णय जाहीर करून टाकला. वास्तविक कोणताही महत्वाचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घ्यावा लागतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्याबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, कॉँग्रेस मंत्र्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निर्णय जाहीर करण्यााबबत कुरघोडीचा प्रयत्न होत आहे. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच खमके असल्याने कॉँग्रेसच्या मंत्र्यांना तोंडावरही पडावे लागत आहे.

Vijay Vadettawar made a fuss about the lockdown decision, the decision was changed by the Chief Minister’s Office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात