CoronaVirus Test : केवळ गुळण्या करून ओळखा तुम्ही पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह आहात ; ICMR कडून नव्या पद्धतीला मंजुरी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना चाचणीची एक नवी पद्धत शोधून काढली आहे. नव्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही दिली. विशेष म्हणजे फक्त तीन तासांत चाचणीचा रिपोर्ट मिळू शकेल. CoronaVirus New Test : Saline Gargle RT-PCR Test

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धत शोधली आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.

कशी आहे नवी पद्धत..

सलाईन गार्गल आरटी-पीसीआर चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो.



एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार केलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. सोल्युशन गरम केल्यानंतर एका ‘RNA’ टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते. ‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांच्या माहितीनुसार नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं.

लोक स्वतःहून कोरोनाची चाचणी करू शकतील. कारण ही प्रक्रिया ‘सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देते. चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज नाही. यामुळे वेळही वाचतो. नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसंच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटलं आहे.

CoronaVirus New Test : Saline Gargle RT-PCR Test

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात